जेलभरो आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर गंगाखेडात शिवसेनेची बैठक. 15 जून रोजीचे जेलभरो आंदोलन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 12 जून 2018

जेलभरो आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर गंगाखेडात शिवसेनेची बैठक. 15 जून रोजीचे जेलभरो आंदोलन.

जेलभरो आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर गंगाखेडात शिवसेनेची बैठक. 15 जून रोजीचे जेलभरो आंदोलन.

गंगाखेड, दि. ११  शिवसेना खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी यापूर्वी मोर्चे- रास्तारोको आंदोलने झाली. शुक्रवार, १५ जून रोजी खासदार  जाधव यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्हाभर जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. या पाश्र्वभूमीवर शिवसेना तालुकाप्रमुख विष्णू मुरकुटे यांच्या शिवसेना संपर्क कार्यालयात पदाधिकार्यांची बैठकीचे आयोजीत करण्यात आली होेती.
१५ जून रोजी शिवसेना व शेतकर्यांच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात गंगाखेड विधानसभाप्रमुख संतोष मुरकुटे, उपजिल्हाप्रमुख प्रा. पंढरीनाथ धोंडगे, सभापती बालासाहेब निरस, महिला संघटक सखुबाई लटपटे, पं.स.उपसभापती सौ.सारिका शेंडगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. आज ११ रोजी शिवसेना तालुका संपर्क कार्यालयात तालुका शिवसेना पदाधिकार्यांची बैठक घेऊन आंदोलनाची दिशा व नियोजन ठरविण्यात आले. या बैठकीस उपजिल्हाप्रमुख प्रा.डॉ. पंढरीनाथ धोंडगे, तालुकाप्रमुख विष्णू मुरकुटे, महिला संघटक सखुबाई लटपटे, उपसभापती सारिका शेंडगे, शिक्षकसेना जिल्हाध्यक्ष बाळासाहेब राखे, युवा ब्रिगेडचे संदिप राठोड, उपतालुकाप्रमुख धोंडीराम जाधव, रामकिशन शिंदे, नागेश जाधव, पं.स. सदस्य जानकिराम पवार, नगरसेवक तुकाराम तांदळे, माधवराव शेंडगे, सर्कलप्रमुख सिद्धेश्वर मुरकुटे, नागनाथ काळे,  वामन राठोड, राम मुसळे,  आदींसह अनेक शिवसेनिकांची  उपस्थिती होती. बैठकीचे प्रास्ताविक तालुकाप्रमुख विष्णू मुरकुटे यांनी केले.  तर आभार धोंडीराम जाधव यांनी मानले. या जेलभरो आंदोलनात शेतकरी, शिवसैनिक, शिवसेना पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन गंगाखेड तालुका शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख विष्णू मुरकुटे यांनी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें