पालम तालुक्यातील पहिली मुलगी पीएसआय.पालम तालुक्यात आनंदोत्सव साजरा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 24 जून 2018

पालम तालुक्यातील पहिली मुलगी पीएसआय.पालम तालुक्यात आनंदोत्सव साजरा.



पालम ( अनीस खुरेशी )
पालम तालुक्यातील मौजे नावलगाव येथील मराठा समाजातील शेतकरी कन्येने समाजातील सर्व रूढी परंपरेला ओलांडून अत्यंत जिद्दीने अत्यंत बिकट परिस्थित पोलीस उपनिरीक्षकपदी झेप घेतली.भाग्यश्री ही बालवयापासुनच अत्यंत हुशार मुलगी आहे.तिचे प्राथमिक शिक्षण नावलगावच्या जिल्हा परिषद शाळेत झाले व दहावीचे शिक्षण मौजे नाव्हा तालुका पालम येथील संत मोतीराम विद्यालयात पुर्ण करून बारावीचे शिक्षण अहमदपूर मध्यील म.गांधी महाविद्यालयात झाले.नांदेड येथे बिएडचे शिक्षण उत्तीर्ण केले तसेच मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून कला पदवी मिळवली.परंतु जिद्द व अभ्यासू मनोवृत्ती असल्याने तिला घरी बसु देत नव्हती.घरची प्रसिद्ध बिकट असताना आई वडीलांनी दिलेल्या आधारावर तीने औरंगाबाद येथे जाऊन अत्यंत तोडक्या पगारावर खाजगी नौकरी करून आपले शिक्षण पूर्ण केले तिने परिस्थितीचा कोणताही अभ्यासावर परिणाम होऊ न देता डोळ्यासमोर आपले ध्येय ठेवून अभ्यास केला व पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल संपूर्ण पालम तालुक्यातून तिचे कौतुक होत आहे.मुलीच्या शिक्षणासाठी   पालकांनी स्वतःहून प्रोत्साहन द्यावे पालम तालुक्यात प्रथमच महिला पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल आनंद उत्सव साजरा होत आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें