या अपघातात महिला वैमानिकासह इतर तिघांचा मृत्यू झाला असला तरी वैमानिकाच्या प्रसंगावधानानं हजारो लोकांचे प्राण वाचले आहेत. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचं समजल्यानंतर वैमानिकानं प्रसंगावधान दाखवत गर्दीच्या ठिकाणावरून विमान जागृती इमारतीच्या बाजूला बांधकाम सुरू असलेल्या मोकळ्या ठिकाणी वळवलं आणि तिथेच ते लँडिंग करत असताना कोसळलं.दुर्घटनास्थळी पोलिसांच्या तपास पथकास अपघातग्रस्त चार्टर्ड विमानात बसविलेला 'ब्लॅक बॉक्स' सापडला आहे. घाटकोपर पोलीस ठाण्याचे अधिकारी, अग्निशमन दलाचे जवान आणि एनडीआरएफचे जवानांचे मदतकार्य सुरु आहे. मात्र, या अपघातामागील कारण हे 'ब्लॅक बॉक्स' हे उपकरण उलगडणार आहे. कारण हे उपकरण अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला आणि अपघातग्रस्त विमानाचे ठिकाण ट्रेस करण्यास मदत करतं. हा बॉक्स भगव्या रंगाचा असतो. जेणेकरून अपघातस्थळी भडक रंग पटकन तपास पथकास आढळून येतो. या बॉक्सचे एफडीआर (फ्लाईट डेटा रेकॉर्टर) आणि सीवीआर (कॉकपिट व्हॉइस रेकॉर्टर) हे दोन प्रमुख घटक आहेत. एफडीआरद्वारे अपघाताआधी २५ तासांचा तपशील मिळतो. तर सीवीआरद्वारे अपघातापूर्व २ तासांचा तपशील मिळतो. हे उपकरण आंतरराष्ट्रीय नियमानुसार इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशनच्या देखरेखीखाली विमानात बसविले जाते. विमानाच्या मागील बाजूस हा ब्लॅक बॉक्स बसविला जातो.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें