उपळीच्या पुल बांधकामासाठी विशेष बाब म्हणून तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याची मागणी ; - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 27 जून 2018

उपळीच्या पुल बांधकामासाठी विशेष बाब म्हणून तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याची मागणी ;


सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवेदन सादर;

सिल्लोड : (प्रतिनिधी) दि.26
सिल्लोड तालुक्यातील उपळी गावाजवळील अंजना नदीवरील पुल ढगफुटीमुळे पुरात वाहून गेला असुन नव्याने पुल बांधकामासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष बाब म्हणून तात्काळ मंजूरी देण्यात यावी असी मागणी माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांनी सार्वजनिक बांधकाम व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शनिवारी ( दि.25) सायंकाळी पिशोर परिसरात ढगफुटी झाल्याने अंजना नदीस जोराचा पुर येऊन (भराडी ग्रामीण मार्ग 101) उपळी नदीवरील पुल दोन्ही थडा खचून वाहून गेला आहे.
पुल वाहून गेल्याने उपळी, भराडी, लोणवाडी, पळशी, मांडगाव, आदी गावांचा संपर्कच तुटला असुन या गावातील नागरिकांना 15 ते 20 किलोमीटर चा वळसा घेऊन भराडी येथील बाजार पेठेस जावे लागत असुन अनेकानेक समस्यांना समोरे जावे लागत आहे. माजीमंत्री आ.अब्दुल सत्तार यांनी उपळी गावाजवळील वाहून गेलेल्या पुलाची पाहणी करून सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवेदन सादर करुन उपळी येथील पुलास विशेष बाब म्हणून तात्काळ मंजूरी देण्यात यावी तसेच वाहून गेलेल्या पुलाच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी असी मागणी केली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें