जिल्हा मध्यवर्ती सहकार बँक शेतकऱ्यांची हक्काची बँक ; अधिकाऱ्यांनी शेतक-यांना त्रास देण्याचे पाप करू नये - आ. अब्दुल सत्तार ; - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 28 जून 2018

जिल्हा मध्यवर्ती सहकार बँक शेतकऱ्यांची हक्काची बँक ; अधिकाऱ्यांनी शेतक-यांना त्रास देण्याचे पाप करू नये - आ. अब्दुल सत्तार ;

 तात्काळ कर्जपुरवठा करण्यासंदर्भात बँक अधिका-यांना सुचना ;


सिल्लोड : प्रतिनिधी ( दि.२८ ) -
सिल्लोड तालुक्यातील भवन येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेस भेट देऊन नागरिकांच्या अडी - अडचणी जाणून घेतांना बँकेच्या अधिका-यांना कडक सुचना देतांना म्हणाले जिल्हा मध्यवर्ती सहकार बँक शेतकऱ्यांची आर्थिक उन्नतीचे मध्यम असून हक्काची बँक आहे. सहकार बँकेच्या कुठल्याच शाखेत शेतकऱ्यांसह गोरगरिबांची अडवणूक करून वेठीस धरण्याचे काम होता कामा नये, आसमानी व सुलतानी संकटात सापडून कर्जबाजारीने हवालदिल झालेला शेतकरी हतबल होऊन आत्महत्या करीत असल्याने त्याला किमान सौजण्याचा व मदतीचा हात आपण दिला पाहिजे असे माजीमंत्री आ.अब्दुल सत्तार यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना सूचना देतांना सांगितले आहे.

सिल्लोड तालुक्यातील भवन येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेस आ.अब्दुल सत्तार यांनी भेट देऊन बँकेचे कर्ज मान्यता अधिकारी सपकाळ व वाघचौरे यांना तात्काळ बोलावून घेऊन उपस्थित शेतकऱ्यांच्या समोरच शेतक-यांना तात्काळ कर्जपुरवठा करण्यासंदर्भात व अडवणूक होणार नाही या बाबत संबंधित यंत्रणेस सुचना दिल्या तसेच महिलांना अधिक वेळ रांगेत उभे राहावे लागणार नाही यासाठी महिलांची एक स्वतंत्र रांग करून वेगळी व्यवस्था करावी. शेतकरी लाभधारकांना हिंववून वेठीस धरण्याचे काम करु नका अशा सुचना दिल्या व नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रामदास पाटील पालोदकर, उपसभापती नंदकिशोर सहारे,  माजी उपनगराध्यक्ष विठ्ठलराव सपकाळ, बाजार समितीचे संचालक सतिष ताठे, चेअरमन हनिफ मुलतानी, जिल्हा सहकार बँकेचे माजी संचालक नाना पाटील कळम, सरपंच राजेंद्र सुरडकर, जिप माजी सदस्य काकाराव कळम, काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष शांतीलाल अग्रवाल, सुभाष जाधव, संचालक गुलाबराव मिरगे, रतन मिरगे आदिंसह नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें