अजिंठा: येथील राशन दुकानदारचा मनमानी कारभार राशनची जास्त दराने विक्री गोर गरिब धान्यापासून वंचित! उपोषणाचा इशारा : - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 25 जून 2018

अजिंठा: येथील राशन दुकानदारचा मनमानी कारभार राशनची जास्त दराने विक्री गोर गरिब धान्यापासून वंचित! उपोषणाचा इशारा :

 मुनीर पठाण
अजिंठा: प्रतिनिधी:
अजिंठा येथील राशन दुकानदार   खुपच मनमानी कारभार करीत असुन राशनची जास्त दराने विक्री करीत कार्ड धारकांने अदा केलेली  रक्कमेची पावती देत नाही. शासन मान्य दरापेक्षा ३०ते ४० रुपये जास्तीची रक्कम प्रत्येक कर्ड धारकाकडून घेतल्या शिवाय त्यांना धान्य देत नाही  थेट दुकानातुन हाकलुन देतात  एकही दुकानात धान्याचे रेट बोर्ड लावलेले नाही. लाभार्थीचे अन्न साखर,रॉकेल इत्यादि ते काळ्या बाजारात जास्त भावाने विकुन टाकत असल्याने अनेक जंण धान्यापासून वंचितच ठेवित असल्याची तक्रार तहसिल कार्यालय सिल्लोड यांच्याकडे करण्यात आली असून सदरील दुकानदाराच्या मनमानी कारभाराला आळा बसविण्यात यावे, जास्त दराने विक्री करीत अनेकांना धान्यापासून वंचितच ठेवित असल्याने  उपोषणास बसू असा इशाराही देण्यात आला आहे.
अजिंठा येथील राशन दुकानदार  हे गावातील अनेक कुटूंबांना स्वस्त धान्यापासून वंचितच ठेवित आहे.  दुकानातील बायोमेट्रिक यंत्रणात नावे आली नाही. गोर गरिबाचे दिशा भुल करून  गावातील अनेक कुटूंबांना धान्यापासून वंचित ठेवल्याबरोबरच जास्त दराने धान्य तसेच राॅकेलही विक्री करीत आहे. राॅकेल अनेक महिन्यांपासून वाटपच करण्यात आले नाही. तुम्ही कोणत्याही अधिका-यांकडे जाऊन माझी तक्रार करा अमचे कुणी काहीही करित नाही अशी धमकी देऊन आमच्या येथील अनेक कुटूंबांना स्वस्त धान्यापासून वंचितच ठेवित आहे. सदरील स्वस्त धान्य दुकानाची सखोल चौकशी करण्यात यावी, दोषी दुकानदारानां निलंबित करण्यात  यावे तसेच सदरील राशन दुकानदाराविरोधात कारवाई करून सखोल चौकशी करावी नसता आमच्या संघटने कडून लोकशाही मार्गने आम्ही ग्रामस्थ अजिंठा येथे उपोषणास बसू असा इशारा नॅशनल अॅन्टी क्राईम हुमन राईटस कॉन्सील ऑफ इंडिया चे जनरल सेक्रेटरी -.शेख कादर शे. मजीद यांनी  तहसिल कार्यालयाकडे निवेदनाद्वारे दिला आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें