सोनपेठ येथे पाच दिवसीय मोफत योग-प्राणायाम शिबिराचे आयोजन.
सोनपेठ(राजेश खेडकर) दि.१९जून २०१८
सोनपेठ शहरात प्रती वर्षा प्रमाणे याही वर्षी भव्य पाच दिवसीय मोफत योग-प्राणायाम शिबिराचे आयोजन करण्यात आले असून याचा शहरवाशीयांनी लाभ घ्यावा असे आवाहन पतंजली योग समिती शाखा
सोनपेठ यांच्या वतीने करण्यात आले आहे. याविषयी नुकतीच नागनाथराव सातभाई यांच्या निवासस्थानी आंतरराष्ट्रीय योग दिन २०१८ च्या अनुषंगाने पतंजली योग समिती सोनपेठ ची बैठक संपन्न झाली. या बैठकीत दि.२०जून ते २४ जून २०१८ या कालावधीत *'योग-प्राणायाम शिबीर'* घेण्याचे
ठरले. येथील छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभाग्रह येथे पहाटे ठीक ५ ते ७वाजेपर्यंत शिबीराचा कालावधी असेल. सुरुवात श्री गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते दिप प्रज्वलीत करून सुरुवात करण्यात येणार असून; यावेळी प्रमुख उपस्थिती मा.आ.व्यंकटराव कदम, मा.जि.प.अध्यक्ष राजेश विटेकर, नगराध्यक्षा सौ.जिजाबाई राठोड आदी मान्यवर उपस्थित राहणार असून प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य डि. एम. शेप प्रभारी परभणी जिल्हा पतंजली योग समिती, प्रा. बी . टी . राठोड
जिल्हा युवा प्रभारी परभणी जिल्हा पतंजली योग समिती तर शिबीर योग प्रशिक्षक प्रा.विठ्ठल जायभाये, मोहन चौलवार हे राहणार आहेत. या बैठकीस सर्वश्री राधाकिशन हिक्के पाटिल, उमेशअप्पा नित्रुडकर, नागनाथ कोटुळे, ज्ञानेश्वर डमढरे, मोहन चौलवार, अशोक मस्के, सुरेशराव पाथरकर, प्रा.विठ्ठल जायभाये, मोहन चौलवार आदी पदाधिकारी-सदस्य उपस्थित
होते. या उपक्रमास जय भवानी मित्र मंडळ अध्यक्ष बळीराम काटे व सर्व
सदस्यांचे सहकार्य लाभणार आहे. शिबीरात महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था केलेली असून या शिबीराचा अधिकाधीक जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन पतंजली योग समिती व भारत स्वाभिमान न्यासाच्या सदस्यांनी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें