मानवत/ मुस्तखीम बेलदार
दि.२५: पाथरी विधान सभा मतदार संघाचे विकास पूरूष आमदार श्री.मोहन भाऊ फड,
मानवत नगर परिषेदेचे शिल्पकार डाॅ.अकूंश लाड ,व कार्यदक्ष मूख्याधिकारी श्री उमेश ढाकणे , नगराध्यक्षा शिवकन्या स्वामी यांच्यासह एस.एच.बोरेवाड ,उबेद चाऊस ,नागेश जोशी,ओम चव्हाण ,सुभाष लाडगे यांच्या अथक परिश्रमाने व सर्व कर्मचारी टिम , सफाई कामगार व योग्य नियोजना मूळेच आज मानवत शहराचा सर्वांगीन विकास व शहर स्वच्छेतेकडे अधिक लक्ष दिल्यानेच मानवत शहर नंबर १ वर आहे.मानवत शहराचा सर्वांगिन विकास होत असतांना नागरीकांच्या आरोग्याकडे लक्ष देत शहर स्वच्छतेकडे मानवत नगरपरिषदचे मुख्याधिकारी व युवानेते डॉ.अंकुश लाड यांनी आमदार मोहन फड यांच्या मार्गदर्शनात शहरातील स्वच्छतेकडे बारकाईने लक्ष दिले आहे. याचा परिणाम म्हणून स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये १ लाखपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरात मानवत शहराने देशांतून ५६ वा क्रमांक मिळविला आहे तर परभणी जिल्हयातुन प्रथम क्रमांक मिळविला आहे.
मागील वर्षभरा पासून प्रचंड मेहनत घेणारे नगर परिषदेचे सर्व अधिकारी, दर दिवशी जिव आेतून या कामी परिश्रम घेणारे दरोगा आणि त्यांचे कर्मचारी,सफाई कामगार तसेच पदाधिकारी यांचे परीश्रम आणि शहरातील सर्व नागरिकांचे सहकार्य या मुळे मानवत शहर स्वच्छतेत देशातील १ लक्ष लोकसंखे पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरात देशातुन ५६ वा क्रमांक मिळऊन नगरपरिषदने आपल्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला असून देशात पहिल्या शंभरात मानवत शहराला मान मिळाल्याने या नगरपालिकेचा आता देशपातळीवर आपले नाव केल्याने न.प.च्या कर्मचारीवर्गासह शहरातील नागरीकही आनंद व्यक्त करत असुन नगरपरिषद कर्मचारीवर्गाना शहरवासियाकडुन शुभेच्छा मिळत आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें