पालम तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर शिवसेनेचे आज सकाळी अकरा वाजता ठिय्या आंदोलन संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 25 जून 2018

पालम तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर शिवसेनेचे आज सकाळी अकरा वाजता ठिय्या आंदोलन संपन्न.


पालम (अनीस खुरेशी)पालम तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर शिवसेनेच्या वतीने  सकाळी अकरा वाजता ठिय्या आंदोलन करण्यात आले. तसेच तहसील कार्यालयातसुद्धा ऑनलाईन सातबारा मिळण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते.

शेतकऱ्यांना तत्काळ पिक कर्ज वाटप करावे, कागदपत्रांसाठी बँकेत त्यांची अडवणूक करू नये यासह अन्य मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने आज सकाळी एसबीआय बँकेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी क्षेत्रीय अधिकारी रविराज पेंदम यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यानंतर आंदोलकांनी ऑनलाईन सातबारा मिळण्यासाठी होत असलेल्या अडचणीमुळे तहसील कार्यालयाकडे आपला मोर्चा वळवला. यावेळी तहसीलदार तेजस्विनी  गौरोबा जाधव यांना ऑनलाईन सातबारा मिळत नसेल तर हस्तलिखित द्यावा अशी मागणी करण्यात आली. यावर तहसीलदार जाधव यांनी मंगळवारपासून ऑनलाईन सातबारा देण्यात येतील असे आश्वासन दिले. 

 आंदोलनात तालुका प्रमुख हनुमान पौळ,  शहर प्रमुख गजानन पवार , पांडुरंग होलगे , शेख मुकरम, चंद्रकांत ताटे , बाळासाहेब लोखंडे, एकनाथ मोहीते , पान्डूरंग रोकडे , सुग्रीव पौळ,  नंदू बलोरे , गजानन सिरस्कर आदी सहभागी होते. 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें