जिंतूरात मुलभूत सुविधेचा वनवा!पिण्याचा पाणी, स्वच्छता, एलएडी आदी समस्या?
जिंतूर :प्रतिनिधी
जिंतूर शहरातील दलित वस्ती व अल्पसंख्यिक वस्तीत प्रभाग क्रमांक ८ व १० ह्या ठिकाणी नगर परिषेदेकडुन मुलभूत सुविधा देण्यात अपयश आल्याचे दिसत आहे त्यांत पिण्याचा पाणी, स्वच्छता, स्टेट लाईट या सुविधा न मिळल्याने ह्या वस्तीतील जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र दिसत आहे.
शहरातील दलित वस्तीतील रस्त्याच्या बांधकामासाठी तीन वेळे उदघाटन नेत्यांनी केले पण आज तागयत हे रस्ते व नाल्याचे कामे गुलदस्त्यातच आहे.त्यामुळे येथील जनतेचे हाल होत आहे तर पिण्याचा पाणी हा उन्हाळा लागले तेव्हा पासुन नागरिक वारमवार न.प.च्या कार्यालयात जाऊन अर्ज व विनंत्या घेऊन खेटरा घासत आहे पण कोणाताही अधिकारी व नेते मंडळी डुकून सुध्दा बघत नाही. मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिण्यात केवळ आठवड्यातून एकदाच ते पण केवळ पाच ते दहा मीनटासाठी नळाला पाणी येतो.तर दलित वस्तीतील अँड.मोरे याच्या घरापासुन ते दलित विद्यार्थी आश्रम पर्यंतची तर आशी अवस्था आहे आहे की याठिकाणी एक महिण्यापासुन नळाला एक थेब पण पाणी आलेले नाही या वस्तीत दलित व मुस्लिम समाजातील लोक वास्तव्य करतात ते बहुतांश रोजमजूरी करुण उदरनिर्वाह करतात पण पाण्यासाठी रोजमजुरी सोडून पाण्यासाठी भटकंती करत आहे यंदा कमालीच्या उकीर्डीयामुळे बोअरीचे,हतपंपाचे व विहिरी कोरड्या खाक पडल्यामुळे हे लोक शेवटचे पर्याय म्हणून न.प.प्रशासनकडे जातात पण त्याच्याकडे कोणी डुकन पण बघत नाही, पाणी येत नाही म्हणून .त्यामुळे येथील लोकांना खाजगी पाणी वितरकाकडुन अडवून अव्वाची सव्वा दाम देऊन पाणी खरेदी करुण पाण्याची तहान भागवावी लागत आहे तर अवैध बटली,जार,टँकर द्वारे पाणी व्यावसायिकाची तर चंदी होत आहे.
या वस्तीत स्वच्छतेचे तीन तेरा वाजले आहे न.प.स्वच्छता कर्मचाऱ्यांना फक्त हे मोठ्या नगरसेवकाच्या वार्डासाठीच राखून ठेवलेले दिसत आहे.
त्यातच तीन चार दिवसापासून पाऊस दररोज हजरी लावत असल्यामुळे अनेक दिवसापासून नाल्या तुंबल्यामुळे त्यातच डुकराचा सुळसळाटमुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊन साथीची लागन लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
न.पा.ने गल़ोगल्ली विजेच्या खाबवर एलएडी लावली म्हणून जिल्हाधिकारी यांनी न.पा.जिंतूरचा जाहीर सत्कार करून गौरव केले पण तरी अंधार कायम आहे त्यामुळे एलएडी शोभेच्या वस्तू म्हणून दिसत आहे.ही एलएडी निक्रष्ट दर्जाचे असल्याचे जानकर मंडळी म्हणत आहे त्यामुळे हि एलएडी पण काही फायद्याची दिसत नाही.
तसेच नगर परिषदेत हिच मंडळी विरोधी पक्षातील नगरसेवक होती तेव्हा कर वढीला अरड ओरडा करायची पण सत्तेत येताच यांनी सर्वच करात भरमसाठ वाढ केली आहे तरीही जनतेच्या पदरी मुलभूत सुविधेचा वनवा आहे,त्यामुळे आता तर वरिष्ठ अधिकारी व विकासपुरष नेते मंडळीने लक्ष देऊन या वस्तीत नागरी सुविधा द्यावे अशी मागणी जनतेतून जोर धरत आहे.


कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें