डिग्रसवाडी शिवारात तीन हायवासह एक पोकलँड जप्त. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 25 जून 2018

डिग्रसवाडी शिवारात तीन हायवासह एक पोकलँड जप्त.



◾ एलोरा कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मुरूम उत्खननाला उपजिल्हाधिकारी पारधी यांचा दनका.

◾सेलूत रविवारच्या धडक कारवाईने खळबळ.


सेलू: प्रतिनिधी

तालुक्यातील डिग्रस वाडी शिवारात मागील अनेक  महिण्यापासुन   मुरूम उत्खनन सुरू आहे.   रविवार 24 जून रोजी दुपारी 2 वाजता उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी आपल्या सहका-यासह  घटनास्थळी पोहोचले असता  मुरूम उत्खनन करणा-या नामांकित एलोरा कन्स्ट्रक्शन कंपनी  कॅनॉलच्या कामाकरता मुरूम उत्खनन करत होती.  कोणत्या परवानगीच्या आधारे उत्खनन सुरू होते. कि  होणारे उत्खनन बेकायदेशीर होते.हे  मुरूम उत्खनन करणा-या पैकी कोणीही अधिकृत सांगू शकले नाही. घटनास्थळी उत्खनन सुरू असल्याच्या  या प्रकारावर  धडक कारवाई करून या  ठिकाणावरुन तीन हायवा टिप्पर  व एक पोकलेन मशीन जप्त करून हायवा टिप्पर  सेलू पोलिस ठाण्यात जप्त करून लावण्यात आले तर   पोकलेन मशीन घटनास्थळीच  शेतजमिनीमध्ये उत्खनन चालू असताना  सील करण्यात आलीआहे. यामुळे  रविवारी एलोरा कन्स्ट्रक्शन या नामांकित कंपनीला  उत्खनन बंद करावे लागले. शेतामध्ये करण्यात येणारे  मुरूम उत्खनन कायदेशीररित्या असते तर टिप्पर व पोकलेन जप्तीची नामुष्की या एलोरा कंपोवर आली नसती. तरी देखील कारवाई नंतर उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी यांनी
   चौकशी करण्याकरिता    कंपनीच्या कर्मचाऱ्यांना व अभियंत्यांना सोमवारी उपविभागीय  दंडाधिकारी कार्यालयात उत्खननाचे कागदपत्र घेऊन उपस्थित राहण्याची सांगितले आहे.  जप्त करण्यात आलेल्या  वाहनाचा क्रमांक याप्रमाणे mh 22 aa 3580
Mh 22 aa 3581
Mh22 aa 3117 यामध्ये तीन  हायवा टिप्पर  व एक पोकलेन याचा समावेशआहे. एलोरा कंस्ट्रक्शन या नामांकित कंपनीच्या हायवा टिप्पर व पोकलेन जप्तीची माहिती शहरात पसरताच मोठी खळबळ उडाली होती. आपल्याच तो-यात उत्खनन करणा-यानामांकित कंपनीला उपजिल्हाधिरी उमाकांत पारधी यांनी कारवाई करून मोठा झटका दिलाआहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें