वालुर येथील जि.प.(ऊर्दु)प्रा.शाळेला कुलुप ठोकुन चौथा दिवस. काल गटशिक्षण आधिकरीची भेट तिळा सुटेना.परंतु लोकप्रतिनिधी या प्रकरणी गप्प आहेत. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 21 जून 2018

वालुर येथील जि.प.(ऊर्दु)प्रा.शाळेला कुलुप ठोकुन चौथा दिवस. काल गटशिक्षण आधिकरीची भेट तिळा सुटेना.परंतु लोकप्रतिनिधी या प्रकरणी गप्प आहेत.

वालुर येथील जि.प.(ऊर्दु)प्रा.शाळेला कुलुप ठोकुन चौथा दिवस. काल गटशिक्षण आधिकरीची भेट तिळा सुटेना.परंतु लोकप्रतिनिधी या प्रकरणी गप्प आहेत.


मुस्लीम समाजाच्या मतावर जिंकनारे लोक प्रतिनिधी कुठे आहेत.


प्रतिनिधी.वालुर.दि.21/06/2018.
परभणी जिल्ह्यातील सेलु तालुक्यातल्या मौजे वालुर येथील mmyp संघटना व ग्रामस्थानी शाळेच्या पहिल्याच दिवशी कुलुप ठोकले असुन या प्रकरणाची कोणत्याहि जि.प.चे अधिकारी व वालुर येथील लोकप्रतिनिधी यांनी दखल घेतलेली नाहि.
   संबधित प्रकरण असे कि वालुर येथील जि.प ऊर्दु शाळेतील चार शिक्षकाची अॉनलाईन बदली झालेली आहे.व या ठिकाणी आता फक्त दोनच शिक्षक राहिले आहे.आधिच या ठिकानी 10 शिक्षकाचे पद मान्यता असताना व 270 विद्यार्थी संख्या असुन सुध्दा याठिकानि गेल्या वर्षी 6 शिक्षक कार्यरत होते.व 4 पदे रिक्त होती.परंतु ऑनलाईन बदलीने या ठिकानी 2 शिक्षक आहे.या ठिकानचे रिक्त जागा भरण्या संबधिचे अर्ज मुख्यकार्यकारी अाधिकारी जि.प.परभणी यांना mmyp संघटनेने दिले होते परंतु या प्रकरणी संबधित अधिकारी व विभागाने कोनतिहि दखल न घेतल्याने संघटना व ग्रामस्थ यांनी दि.18/06/2018.सकाळी.10 वाजता.कुलुप ठोकले होते.आज या प्रकरणाला चौथा दिवस असताना कोनिहि दखल घेतलेली नाहि.यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान तर होत आहे परंतु या प्रकरणी वालुर येथील लोकप्रतिनिधी गप्प आहे.
     प्रतिक्रिया =  वालुर येथील जि.प.(ऊर्दु) प्राथमिक शाळेचे आचानकच सहा पैकि चार शिक्षकाची ऑनलाईन बदली होने या मागे मोठे राजकारण असुन अल्पसंख्यक समाजाला शिक्षणापासुन वंचित ठेवण्याचे हे एक प्रकारे कारस्थान हि असु शकते व काहि खासगी शाळावाले स्वतःचे पोळ्या भाजण्याचे काम करित आहे यात शंकाच नाहि. त्यात या प्रकरणी आध्याप कोनत्याहि जि.प.च्या आधिकार्यानी या प्रश्नी दखल घेतलेली नाहि.काल प.समिती गटशिक्षण आधिकारी सेलु यांनी भेट दिली परंतु  प्रश्न सुटलेला नाहि.                                         
           मुस्लीम समाजाच्या मतावर जिंकुन अालेले लोक प्रतिनिधीनी सुध्दा या प्रश्नी दखल घेतलेली नसुन येत्या काळात मुस्लीम समाज यांना त्यांची जागा दाखवेल.यांना माझा प्रश्न आहे कि फक्त बँनर लाऊन व ईदच्या शुभेच्छा देऊ नका मुस्लीम समाजाच्या समस्या सोडवा.   =अनवर दिलावर पठान.महाराष्ट्र मुस्लीम युवक प्रतिष्ठान.(सेलु तालुकाध्यक्ष) व तेज़्ज़न्युज़24 संपादक.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें