अपूर्व उत्साहात मंठा शहरात ईद उल-फित्र साजरी .. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 16 जून 2018

अपूर्व उत्साहात मंठा शहरात ईद उल-फित्र साजरी ..

अपूर्व उत्साहात मंठा शहरात ईद उल-फित्र साजरी ..



मंठा / हाफेज शबाब बागवान
तालुक्यात रमझान ईद शांततेत व उत्सवात  गुरुवारी सायंकाळी चंद्रदर्शनाने पवित्र रमजान महिन्याची सांगता झाली आणि आज तालुक्यात हजारो  मुस्लीम आबालवृद्धांनी अत्यंत उत्साहात व शांततेत रमझान ईद अर्थात ‘ईद-उल-फित्र’चा सण साजरा केला.
नवीन पठाणी पेहराव डोक्यावर टोपी अन् अत्तराचा दरवळलेला सुंगध त्यातच शिरखुर्माचे आस्वादाने शुभेच्छाचा वर्षाव करत मुस्लीम बांधवानी ईद-उल-फित्र म्हणजेच रमजान ईद मंठा  तालुक्यात  मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्व शहर वासियांनी - मुस्लीम बांधवानी या सणाचे महत्व वाढवीत एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
 ईदगाह मैदानवर कारी अंन्सार साहेब ,  यांनी रमजान ईदच्या महत्व या विषय मार्ग दर्शन केले व हाफेज जब्बार साहेब,  यांच्यासह हजारोंच्या संख्येने  मुस्लिम बांधवांना नमाजाचे पठण केले.
पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन  यांच्या मार्गदर्शनाखाली या वेळी पोलिस  बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तालुक्यात ग्रामीण व खेडे गावातील  सर्वच मस्जिदीमध्ये नमाज (प्रार्थना) साठी मुस्लिमांनी अलोट गर्दी केली होती.
कोठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
ईद उत्साहात व शांततेत साजरी करण्याची परंपरा तालुक्यात मुस्लीम व हिंदू बांधवांनी आपली गेल्या अनेक वर्षांची परंपरा कायम राखण्याबद्दल पालकमंत्री बबनराव लोनीकर यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
तहसीलदार राहुल गायकवाड, काँग्रेसचे जिल्हा आध्यक्ष सुरेश कुमार जेथलीया ,  शिवसेना जिल्हा उपप्रमुख ए.जे पाटील बोराडे, नगरध्यक्ष नितिन राठोड, उपनगराध्यक्ष गणेशराव खवणे ,  बालासाहेब ,  बोराडे, माजी कृ बा. स. सभापती संदीप भैय्या गोरे ,  नगराध्यक्ष कैलास बोराडे, माजी  सरपंच राजेश मोरे , आशोक नाना वायळ ,  संभाजीराजे खंदारे,  प्रदीप बोराडे,सहदेव मोरे  प्रा .कमळकर सर , 

 यांनी मुस्लिम , बांधवांना ईदच्या शुभेछा दिल्या.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें