मानवत येथे हेल्थ केअर किलीनिक चे उदघाटन .
मानवत / मुस्तखीम बेलदार .
दि.०९: मानवत येथील बेलदार समाजातील व मुस्लिम समाजातील पहिली डॉ. अंजुम मो. यूनूस शेख (बेलदार) यांच्या दवाखान्याचा उदघाटन मुस्लीम धर्मगुरु मूफ्ती ईस्हाक साहब यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. एन. बी. दगडू यांच्या हस्ते मंगळवार ८ मे रोजी सायंकाळी पाच वाजता करण्यात आले.
या उद्घाटनप्रसंगी नगर सेवक जमील भैय्या, न्यातत खान,डॉ. एन. बी. दगडू, डॉ. वर्मा, निनांद दगडू, डॉ.मनीषा गुजराती, डॉ. शितल जाधव, हाजी मुफ्ती ईस्हाक साहब, हाजी हाफिज अब्दुल लतीफ बागबान, सत्यशिल धबडगे , अब्दुल हाफिज बागबान, भैय्यासाहेब गायकवाड ईतर मान्यवर उपस्थित राहुन सर्वानी शुभेच्छा दिल्या.
डॉ. अंजुम हिने आपले शिक्षण जि.प.शाळा व खान अब्दुल गफ्फार खान शाळा व के.के.एम. कालेज मानवत मधून पुर्ण केले आहे . तीब्बीया मेडिकल काॅलेज मुंबई येथुन बि.यु.एम.एस पूर्ण केले आहे . गेल्या एक वर्षांपासून नुर हाॅस्पीटल मुंबई येथे प्रॅक्टिस करत होत्या. आपल्या मूळ मानवत गावी प्रॅक्टिस करण्यासाठी हेल्थ केअर किलीनिक देवी मंदिर रोड मानवत येथे सुरू केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें