बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.वामनजी मेश्राम यांचे मानवत येथे स्वागत .
मानवत / मुस्तखीम बेलदारदि.९: मानवत येथील महाराणा प्रताप चौकात बहुजन क्रांती मोर्चा चे अध्यक्ष तथा राष्ट्रीय संयोजक वामनजी मेश्राम यांचा सत्कार आज दि.९ मे रोजी मानवत तालुका बहुजन क्रांती मोर्चाचे अध्यक्ष विलास खरात सर यांनी केला. वामनजी मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली २४ एप्रिल २०१८ पासुन निघालेली परिवर्तन याञा हि संपुर्ण महाराष्ट्र भर निघाली आसुन ३ जून रोजी पुणे येथे या परिवर्तन याञेचा समारोप होणार आहे हि परिवर्तन याञा आज दिनांक ९ एप्रिल रोजी पाथरी येथे आली होती येथे बहुजन क्रांती मोर्चाच्या वतिने सभेचे आयोजन करण्यात आले तर पाथरी येथिल सभा आटपून ते परभणी येथिल सभेला जाता आसताना मानवत तालुका बहुजन क्रांती मोर्चाचे अध्यक्ष विलास खरात सर यांनी शहरातील महाराणा चौकात परिवर्तन याञेचे मुख्यअयोजक तथा बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.वामनजी मेश्राम निशा मेश्राम यांचे स्वागत केले यावेळी आंबेडकरवाद युवा मंचांचे अध्यक्ष विजय खरात ,भैय्यासाहेब बोराडे, मेघनाथ भाले ,विजय धबडगे ,शुंभम पंचांगे ,अमोल मगर , धम्मानंद पंडित ,किरण पंडित ,विजय भदर्गे , आकाश धबडगे ,प्रविण बनसोडे , रतन ढवळे ,शिवराज ठेंगे ,शरद ठेंगे , संदिप दातारे , नितिन तुपसमुंद्रे दयासागर मगर , दिपक डोगरे , आकाश सोनटक्के , अमोल भदर्गे आदी कार्यकर्ते उपस्थीत होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें