सराटी - बोदवड परिसरात मिरची लागवडीस सुरुवात.
अनेक हेक्टर क्षेत्रावरील मिरची रोपे लागली करपू .
सराटी (संतोष लहाने )दि 09सिल्लोड तालुक्यातील सराटी - बोदवड परिसरातील अनेक शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात मिरची लागवडीस सुरुवात केली आहे. महिनाभरापासुन शेती मशागत करुन ठिबक - पन्नी अंथरूण आठवडाभरापासुन मिरची लागवडीस सुरुवात करण्यात आली आहे. उन्हाची तीर्वताही दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे.पन्नी अंथरुण ठिबकमध्ये मिरची लागवड करण्यास शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे. पण उन्हाची तीर्वता खुपच वाढत असल्याने अंथरण्यात आलेली पन्नी उन्हाच्या तीव्रतेने तापून लागवड करण्यात आलेली मिरची रोपे करपून जात आहे.
सराटी - बोदवड येथील शेतक-यांनी आठवडाभरापासुन मिरची लागवडीस सुरुवात केली आहे. यावर्षी येथील अनेक शेतक-यांनी मिरची लागवडीस मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे. अनेक हेक्टर क्षेत्रावर मिरची लागवड करण्यात येत आहे. मिरची पिकात गवत होऊ नये यासाठी पन्नी अंथरूण ठिबकवर मिरची लागवड करण्यात येत आहे. सराटी - बोदवड परिसरातील अनेक हेक्टर क्षेत्रावर मिरची लागवड करण्यात आली असली तरी दिवसेंदिवस उन्हाची तीर्वता वाढतच असल्याने पन्नीही खुपच तापत असल्याने पानकापडाच्या तीर्वतेने मिरची रोपे करपून जात आहे.
पन्नी अंथरूण ठिबकवर मिरची लागवड करण्यात येत असली तरी उन्हाच्या तीव्रतेने मिरची रोपे करपून जात असल्यामुळे शेतक-यांना आर्थिक संकटास सामोरे जावे लागत आहे. अर्ध्याहून अधिक मिरची रोपे करपून जात असल्याने मिरची रोपांची नव्याने पुर्नरलागवड करावी लागत असल्याने शेतक-यांना आर्थिक झळ सोसावी लागत असल्याचे सराटी येथील मिरची उत्पादक शेतकरी साहेबराव पाटील गुळवे,शिवाजी पाटील गुळवे,पंकज घायवट,राजू गायकवाड,गणेश गुळवे,सुनिल गुळवे,योगेश गुळवे,शांताराम गुळवे,शिवाजी शेळके,आदि शेतक-यांनी सांगितले.
मिरची रोपे करपून जात असल्याने सराटी - बोदवड परिसरातील अनेक शेतक-यांसमोर एकप्रकारचे आर्थिक संकटच ओढवल्याने परिसरातील शेतकरी खुपच हतबल झाला आहे.
शेतक-यांच्या मानगुटिवर कर्जांचं ओझं - आ.अब्दुल सत्तार;
सिल्लोड तालुक्यातील शेतकरी - शेतमजुर कर्जबाजारीपणाच्या विळख्यात अडकलेला असुन खुपच हतबल झालेला आहे. सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे अगोदरच अडचणीत सापडलेला बळीराजा मिरची उत्पादनातून आर्थिक अडचणींमधून सावरण्याचा प्रयत्न करीत असतांनाच यावर्षी उन्हाच्या अधिक तीव्रतेने मिरची रोपे करपून जात असल्याने आर्थिक दुहेरी संकट ओढवले असल्याने शेतक-यांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.सिल्लोड तालुक्यातील मिरची उत्पादक शेतक-यांना कृषी अधिकारी - कर्मचा-यांकडून सखोल मार्गदर्शनाची गरज असुन मिरची उत्पादक क्षेत्राचेही पंचनामे करुन शेतक-यांना आर्थिक सहाय्य मिळविण्यासाठी प्रशासनाकडे सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें