मानवत येथे शिवसेनेकडुन रास्तारोको आंदोलन.
मानवत / मुस्तखीम बेलदारदि.०५: मानवत येथील महाराणा प्रतापसिंह चौक येथे शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांचे विविध प्रश्नासाठी व विमा कंपनीवर गुन्हे दाखल करण्यासाठि मानवत शिवसेनेच्या वतीने आज दि.५ मे रोजी सकाळी १० वाजता रास्तारोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनावेळी तहसिलदार नकुल वाघुंडे तसेच पोलीस निरीक्षक प्रदिप पालीवाल उपस्थीत होते.रिलांयस कंपनीने पीक विमा संदर्भात शेतकर्यांची फसवणूक केल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांचे जाणते खा. संजय ऊर्फ बंडू जाधव यांच्या आदेशावरून मानवत येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी शहर प्रमुख राजेश कच्छवे , माजी शहरप्रमुख अनिल जाधव , नगर सेवक दिपक बारहाते , माणीक काळे , उप सभापती संतोष जाधव , रशहरउपाध्यक्ष दाहे , शंकर क्षिरसागर , राजु महिपाल , उप संरपच बबलू राजे , महादू भुजबळ अर्जुनसिंग , अशोक घाटुळ, संतोष सातव , विठ्ठल कदम यांच्यासह शेतकरी मोठ्याप्रमाणात उपस्थीत होते

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें