लोअर दुधना धरणातून डाव्या व उजव्या कालव्यात शेतीसाठी पाणी सोडण्यात यावे=अँड श्रीकांत वाईकर.
सेलू,प्रतिनिधी.समशेर खान.शेतकर्यांना आगामी काळात बागाईत शेती करण्यासाठी निम्न दूधना प्रकल्पातून डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी अँड श्रीकांत वाईकर यांनी केली आहे.
यासाठी सेलू तालुका दबाव गटातर्फे कार्यकारी अभियंता परभणी यांना सोमवार २८/५/२०१८ रोजी निवेदन देण्यात आले. परिसरात पिण्याचे पाणी व जनावरांच्या चारा व पाणी प्रश्र्न गंभीर आहे.लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना बागायती व नवीन पिक हळद, कापुस उत्पादक.पिकांच्या नव्याने लागवड करण्यासाठी पाण्याची अत्यंत निकड आहे.धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. शेतकर्यांच्या मागणीचा सहानुभूती पुर्वक विचार करून लोअर दुधना धरणातून पाणी डाव्या व उजव्या कालव्यात शेतीसाठी सोडण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यासाठी अॅड श्रीकांत वाईकर, ओमप्रकाश चव्हाळ, विठ्ठल काळे, मुकुंद टेकाळे,रामचंद्र कांबळे,विजय काकडे, विलास रोडगे, दत्ता गायकेे आदींनी पुढाकार घेतला आहे . अभियंता शिंगाडे साहेब यांनी सकारात्मक कारवाई चे आश्र्वासन शिष्टमंडळाला दिले असल्याची माहिती अँड वाईकर यांनी दिली आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें