पुरूषोत्तम मासानिमित्त नरवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन.
महिला किर्तनकार ठरनार आकर्षण.
सोनपेठ (राजेश खेडकर) दि.२१मे २०१८.
तालुक्यातील मौ.नरवाडी येथे पुरूषोत्तम मासानिमित्त फक्त महिला वारकऱ्यांच्या सहभागातून भव्य अखंड हरिनाम सप्ताहास आज सोमवार दिनांक २१ मे पासुन मोठ्या उत्साहात सुरूवात झाली.
दर तीन वर्षानी येनारा अधिक मास तथा पुरूषोत्तम मास हा हिंदु धर्मात अत्यंत पवित्र असा महिना समजला जातो; त्यामुळे या महिन्यात मोठ्या प्रमाणात अन्नदान, नामस्मरणासह विविध धार्मिक विधीला खुप महत्व आसल्याने या महिन्यात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जाते.
याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील मौजे नरवाडी येथे आज सोमवार दिनांक २१ मे पासुन महिला वारकऱ्यांनी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. यात श्रीमद् भागवत कथा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व किर्तन सोहळा आदी ऊपक्रमांचा समावेश आहे. भागवत कथेचे कथेचे निरूपन ह.भ.प.गिताताई देशमुख या आपल्या सुमधुर वाणीतुन सुश्राव्य संगिताच्या साथीने करनार आसुन, ज्ञानेश्वरी पारायणाच्या प्रमुख ह.भ.प.मंगलताई पांचाळ या आसनार आहेत.
या सप्ताहात पहाटे ४ ते ६ काकड आरती, सकाळी ६ ते ७ विष्णुसहस्त्रनाम जप, ७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी १ ते ५ भागवत कथा, सायंकाळी ६ ते २ धुपारती, रात्री ९ ते ११ हरिकीर्तन तर मध्यरात्री १२ ते ३ वेगवेगळ्या गावच्या वारकऱ्यांचा हरिजागर होईल.
सप्ताहात सोमवार दिनांक २१ मे रोजी ह.भ.प.प्रतिभाताई गित्ते परळीकर, मंगळवार दिनांक २२ मे रोजी ह.भ.प.कु.पोर्णिमाताई आळंदिकर,बुधवार दिनांक २३ मे रोजी ह.भ.प.कु.गिताताई देशमुख, गुरूवार दिनांक २४ मे रोजी ह.भ.प.रेपाताई सौने, शुक्रवार दिनांक २५ मे रोजी ह.भ.प.अंजनाताई जगताप, शनिवार दिनांक २६ मे रोजी ह.भ.प.आशाताई राऊत, रविवार दिनांक २७ मे रोजी ह.भ.प.आंजलीताई केंद्रे यांचे हरिकीर्तन होईल व सोमवार दिनांक २८ मे रोजी सकाळी ८ वाजता गावातून श्रींची पालखी मिरवणुक होऊन ११ ते १ यावेळात ह.भ.प.महंत राधाताई सानप यांचे काल्याचे किर्तन होनार आहे. नंतर गयाबाई जोगदंड यांच्यावतीने महाप्रसाद होऊन या सप्ताहाची सांगता होईल.
तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या ज्ञानामृताचा व महाप्रसादाचा लाभा घ्यावा असे आवाहन नरवाडी येथील समस्त महिला मंडळ व महिला वारकऱ्यांनी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें