दोस्तों का मेला " तुफान "बन रहा हैं...! नजराणा सिल्लोड मतदारसंघाचा....? - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 5 मई 2018

दोस्तों का मेला " तुफान "बन रहा हैं...! नजराणा सिल्लोड मतदारसंघाचा....?

दोस्तों का मेला " तुफान "बन रहा हैं...!

नजराणा सिल्लोड मतदारसंघाचा....? 

सराटी (संतोष लहाने )दि 05
सिल्लोड - सोयगाव मतदारसंघातील राजकीय गोटात सध्यातरी शांतता पसरली असल्याचे पाहायला मिळत असले तरी भाजपच्या राजकीय फडात
" ठगणराव पाटील भागवत " वादळात " सुनिल मिरकर " यांची अधिकची भर पडल्याने भाजप मधील आपले वजन टिकवून ठेवण्यात "सुरेश बनकर " यांना चांगलीच मेहनत करावी लागत असल्याचीच चर्चा ऐकायला मिळत आहे . तर दुस-या गोटात सर्वसामान्यांची मोट बांधून भवन रणांगण गाजवणारी भाजप तालुकाअध्यक्ष ज्ञानेश्वर मोटे - इद्रीस मुल्तानी जोडी नंबर वन च्या शोधात
" अभी नहीं तो कभीं नही " या पंचसुञात हळूवारपणे मजल मारतांना चर्चेच्या
" गु-हाळाला " खतपाणी घालण्याचे काम करीत आहे.
एकच वादा फक्तच " दादा " वर केंद्रीत या राजकीय वलयातील या मंडळींना आमदारकीचे एकप्रकारे डोहाळेच लागलेले असले तरी सध्यातरी भाजप गोटात शांततामय वातावरण असुन अधूनमधून
" ठगणराव पाटील भागवत " वादळात " सुनिल पाटील मिरकर " वादळाची भर पडत ग्रामीण भागात " डफाचा " आवाज गोंगावत " आम्ही गोंधळी - गोंधळी अंबामातेचे गोंधळी , आमची व्हावी आता पुकार नसता आम्ही पुन्हा " जय भवानी - जय शिवाजी " गाजवणार....! अशाच ग्रामीण भागातील राजकीय चर्चेला एकप्रकारचं खतपाणी घालण्याचे काम करीत असल्याचे नाकारता येत नाही...!
तर दुसरीकडे हळूवारपणे आपली आगेकूच करीत माजी आ.सांडु पाटील लोखंडे यांनी आपल्यातील " सच्चा " पाटील घडवित
" संघाच्या " माध्यमातून नव " संजीवनी " मिळविण्यासाठी संघाचा " डोंगर " पोखरण्यास सुरुवात केली असल्याची चर्चाही दमदारपणे समोर येत आहे. पण
सब मिलकर आपलेच " भिडू " या सुञाचा अवलंब करीत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांनी पुन्हा एकदा सर्वांची एकजूट घडवून आणली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे .
अपना - अपना गड फत्ते करीत एकच वादा पुन्हा
" दादा " चा पत्ता टिकवून ठेवण्यासाठी " पाटलाचा नांदच खुळा " या नव्या जोमाने रावसाहेब पाटील दानवे यांचे " दानशुर " पुन्हा एकदा कामाला लागले असल्याचेच चित्र सध्यातरी पाहायला मिळत आहे... असेच काहीसे म्हणायला हरकत नाही !
" पुढील अंकात - हॅट्रीक चान्स.....?
"भाई - भाई होते है....? दोस्तों का मेला " तुफान " बन रहा है , इतना भी मत सोच मेरे दोस्त.... अभी तो " अर्जुन बाण आ रहा हैं और " बच्चू कडू " की ललकार पुकार रही हैं....! में तो सीधा - साधा हूं....कल कीं सोच और आज का नजर - अंदाज रखता हूं....! कल का मेला भी पसंद था....आज का मेला भी पसंद हैं....! इंतजार हैं बस्स अब दोस्तों के " तुफान " का ?

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें