सोयगाव देवी येथिल शेतकर्याची गळफास घेऊन आत्महात्या.कर्जाचा हप्ता फेडण्यासाठी पैसे नसल्याने आत्महात्या केल्याचा घरच्यांचा आरोप. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 2 मई 2018

सोयगाव देवी येथिल शेतकर्याची गळफास घेऊन आत्महात्या.कर्जाचा हप्ता फेडण्यासाठी पैसे नसल्याने आत्महात्या केल्याचा घरच्यांचा आरोप.

सोयगाव देवी येथिल शेतकर्याची गळफास घेऊन आत्महात्या.                                              कर्जाचा हप्ता फेडण्यासाठी पैसे नसल्याने आत्महात्या केल्याचा घरच्यांचा आरोप.

शे.सलिम.
 प्रतिनिधी : भोकरदन
सततची नापिकी व कर्जबाजारी पणाला कंटाळुन सोयगाव देवी येथिल शेतकरी राजाराम सांडु सहाने वय ३४ या युवकाने राहा दि.१ मै मंगळवार रोजी सकाळी १ च्या दरम्यान राहात्या घरी फॅनला गळफास घेऊन आत्महात्या केली.

  अधिक माहिती अशी की,भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी येथिल युवक राजाराम सहाने यांच्या नावावर आडीच एक्कर कोरडहु जमिन असुन,या जमीनीतुन निघणार्या उत्पन्नातुनच त्यांचा घराचा उदरनिर्वाह चालत होतो.राजाराम यांनी शेतीसाठी बॅंक आॅफ महाराष्ट् शाखेकडुन ६० हजार रूपये कर्ज घेतले होते,आणि महिद्रा फायनसकडुन दिड लाख असे कर्ज घेऊन त्यांनी शेती केली पण कोरडहु जमिन असल्याने त्यांना पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न निघाले नाही.आणि पण राजाराम यांनी महिद्रा फायनसचे काही हफ्ते भरले.
 
  पण ५ डिसेंबर २०१६ ला त्यांचेकडे महिद्रा फायनसचा हफ्ता भरण्यासाठी पैसे नसल्याने व बॅंक कर्मचार्यांनी पैसे भरण्यासाठी तंगु लावल्याने राजाराम सहाने यांनी मिञांकडुन हात उसने पैसे जमा करून मार्च महिण्यात २३हजार ९०० हफ्तासह दंडाची रक्कम भरली होती,व त्यांचा परत हफ्ता हा ५ मै ला असल्याने परत बॅंक कर्मचार्यांनी पैशासाठी तंगु लावत असल्याने व हफ्त भरण्यासाठी पैसे नसल्याने राजाराम सहाने यांनी आत्महात्या केल्याचे बायको व भावाने आरोप केला आहे,राजाराम सहाने यांच्या पश्चात मुलगा,मुलगी,व बायको असा परिवार आहे.

  तरी या शेतकर्याच्या वारसांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें