काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबाचे मॉड्युल उध्वस्त; ४ दहशतवाद्यांच्या अटकेसह मोठा शस्त्रसाठा जप्त. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 9 मई 2018

काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबाचे मॉड्युल उध्वस्त; ४ दहशतवाद्यांच्या अटकेसह मोठा शस्त्रसाठा जप्त.

काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबाचे मॉड्युल उध्वस्त; ४ दहशतवाद्यांच्या अटकेसह मोठा शस्त्रसाठा जप्त.

श्रीनगर.
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला भागात सुरक्षा रक्षकांनी मोठी कारवाई करीत लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचे मोड्युल उध्वस्त केल्याचे वृत्त आहे. या कारवाई दरम्यान जवानांनी ४ दहशतवाद्यांसह त्यांना मदत करणाऱ्या ६ स्थानिक सदस्य़ांना ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. उत्तर काश्मीरच्या पोलीस उपमहानिरिक्षकांनी ही माहिती दिली.
ताब्यात घेण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी नदीम हा स्वतःची ओसामा अशी ओळख सांगत होता, तोच हे मॉड्युल चालवत होता. ताब्यात घेण्यातआलेल्या चारही दहशतवाद्यांनी काही दिवसांपूर्वी तीन नागरिकांची हत्या केली होती. त्यामुळे ते पोलिसांच्या रडारवर होते. त्याच बरोबर या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ६ स्थानिक लोकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कारवाईदरम्यान, पोलिसांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर हत्यारे जप्त केली आहेत की, ते एखादे युद्ध छेडण्याच्या तयारीत असल्याचे चित्र होते, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें