विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी, अडलेली जागा राष्ट्रवादीच्या पदरात !तर परभणी कॉग्रेसच्या हिस्स्याला! - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 3 मई 2018

विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी, अडलेली जागा राष्ट्रवादीच्या पदरात !तर परभणी कॉग्रेसच्या हिस्स्याला!

विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी, अडलेली जागा राष्ट्रवादीच्या पदरात !तर परभणी कॉग्रेसच्या हिस्स्याला!


मुंबई – स्थानिक स्वराज्य संस्थामधून निवडल्या जाणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी अखेर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी निश्चित करण्यात आली आहे. ज्या उस्मानाबाद-बीड-लातूरच्या जागेवरुन आघाडी अडली होती, ती जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरात पडली आहे. त्याबदल्यात परभणीची जागा काँग्रेसला मिळाली असल्यामुळे आता उस्मानाबाद-बीड-लातूर मतदारसंघात भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले रमेश कराड हे आघाडीचे उमेदवार असणार आहेत. आघाडीच्या नव्या समीकरणानुसार कोकण, नाशिक आणि लातूर या तीन जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्या आहेत, तर अमरावती, चंद्रपूर आणि परभणी या जागांवर काँग्रेस उमेदवार देणार आहे.

दरम्यान या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून 21 मे रोजी मतदान पार पडणार आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षातील उमेदवारांकडून आज उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार

उस्मानाबाद-बीड-लातूर – रमेश कराड (राष्ट्रवादी)

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग – अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी)

नाशिक – शिवाजी सहाणे (राष्ट्रवादी)

वर्धा – चंद्रपूर – गडचिरोली  –

परभणी-हिंगोली –

अमरावती –

विधानपरिषदेसाठी शिवसेनेचे उमेदवार

विपुल बजोरिया – हिंगोली-परभणी

नरेंद्र दराडे – नाशिक

राजीव साबळे- रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें