हस्तशिल्प सुवर्ण कारागीरांच्या वतीने कामगार दिन साजरा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 1 मई 2018

हस्तशिल्प सुवर्ण कारागीरांच्या वतीने कामगार दिन साजरा.

हस्तशिल्प सुवर्ण कारागीरांच्या वतीने कामगार दिन साजरा.

परभणी येथे सुवर्णकार कारागीरांना केले सन्मानित.


सोनपेठ (राजेश खेडकर) दि.०१मे २०१८
परभणी येथील गांधी पार्क परिसरातील हस्तशिल्प सुवर्णकार कारागीरांच्या वतीने ०१ मे कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.  यानिमित्त सुवर्णकार समाजातील ज्येष्ठ कारागीरांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
कामगार दिनाचे महत्व समाजातील कारागीरांना कळावे व या निमित्ताने कारागीरांनी संघटीत होवून आपल्या एकीचे बळ प्रदर्शित करावे, तसेच हस्तशिल्प कारागीरांतील ज्येष्ठ कारागीरांचा बहुमान वाढावा. या करिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी सोनार समाजाचे माजी अध्यक्ष संतोष ज्ञा. शहाणे, सराफ व सुवर्णकार असोसिएशन जिल्हा संघटक अमोल अशोकराव कुलथे (पांगरकर) तसेच सत्कारमुर्ती सर्वश्री नंदकुमार टाक, प्रदीपराव टेहरे, दिनेशराव शहाणे, तानाजी शहाणे, लक्ष्मण टेहरे, संतोष माटेगावकर, अमोल पेडगावकर, संजय बोकण, विजय डहाळे, सचिन शहाणे, बालू डहाळे, मधुकर टाक, अनंता शहाणे, सिध्दार्थ कुलथे, नागेश शहाणे आदी हस्तशिल्प सुवर्णकार कारागीर बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें