तेलगांव ते बीड रोडवर भीषण अपघात वडीचे उपसरपंच यांचे अपघाती निधन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 11 मई 2018

तेलगांव ते बीड रोडवर भीषण अपघात वडीचे उपसरपंच यांचे अपघाती निधन.

तेलगांव ते बीड रोडवर  भीषण अपघात वडीचे उपसरपंच यांचे अपघाती निधन.  


प्रतिनिधी.नदिम तांबोळी.
पाथरी:- आज दिनांक ११ मे रोजी तेलगांव ते बीड रोडवर वडी ता. पाथरी जि. परभणी येथील ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच दत्ता बालासाहेब शिंदे, वय ३५,यांचे  सकाळी ११ ते १२ च्या सुमीरास तेलगाव फाटा नजीक अपघाती निधन झाले. वडी येथील गावाचा तरुण तडफदार विद्यमान उपसरपंच दत्ता शिंदे हे लग्न समारंभा साठी जात होते. सकाळी ११ ते १२च्या दरम्यान तेलगांव बीड रोडवर त्यांचे अपघाती निधन झाले, ते फोटोग्राफर म्हणून ही काम करायचे या अपघाता नंतर त्यांचे प्रेत उत्तरीय तपासणी साठी बीड येथील रुग्णालयात  हलविण्यात आले असल्याची माहीती मिळाली आहे. या घटने वडी गावावर शोककळा पसरली असुन. कुंटुंबातील कर्त्या मुलाच्या अपघाता मुळे बालासाहेब शिंदे यांच्या कुंटुंबावर दु:खाचा डोगर कोसळा आहे. दत्ता शिंदे यांना एक मुलगा व एक मुलगी, आई-वडील,भाउु असा त्यांच्या मागे परिवार आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें