आवैध नळ कनेक्शन राडा औरंगाबादेत अनधिकृत नळ कनेक्शनवरुन दोन गट भिडले. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 12 मई 2018

आवैध नळ कनेक्शन राडा औरंगाबादेत अनधिकृत नळ कनेक्शनवरुन दोन गट भिडले.

आवैध नळ कनेक्शन राडा औरंगाबादेत अनधिकृत नळ कनेक्शनवरुन दोन गट भिडले. 

विशेष.प्रतिनिधी.
मोतीकारंजा परिसरातील अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्यावरून झालेल्या वादातून दोन गट शुक्रवारी रात्री भिडले. तलावरी, चाकू , लाठ्याकाठ्यांसह जमावाने तुफान दगडफेक केली. यात पोलीस, नागरिक मोठ्या प्रमाणात जखमी झाले आहेत. दोन्ही गटांनी दिसेल ते वाहने, दुकाने पेटवून दिली. जखमींमध्ये सहायक पोलीस आयुक्त गोर्वधन कोळेकर, क्रांती चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक श्रीपाद परोपकारी यांच्यासह दहा पोलिसांचा समावेश आहे.महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मोतीकारंजा परिसरात अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्याची मोहिम गुरूवारपासून सुरू केली आहे. पहिल्या दिवशी या भागातील एका धार्मिकस्थळाचे नळ कनेक्शन तोडण्यात आले होते. तेव्हा एका गटाने दुसºया एका धार्मिक स्थळाचे नळ कनेक्शन तोडण्याची मागणी केली. यावरून मनपाच्या अधिकाºयांनी दुसºया धार्मिक स्थळाचे नळ कनेक्शन शुक्रवारी तोडले. याच कारणावरुन दोन गट शुक्रवारी सायंकाळी दहाच्या सुमारास भिडले. एका गटाने मोतीकारंजा रोडवरील दिसेल त्या दुकानांवर दगडफेक करण्यास सुरूवात केली. यात दुकानांबाहेर असणाºया कुलर, सामानासह गाड्यांची तोडफोड, जाळपोळ सुरू केली. हे पाहून दुसरा गटही रस्त्यावर उतरला. दोन्ही बाजूकडील सात ते आठ हजारांचा जमाव रस्त्यावर उतरला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस तयारीनिशी घटनास्थळी दाखल झाले. मात्र पोलिसांच्या वाहनावरच दगडफेक करण्यात आली. यात पोलिसांच्या तीन गाड्या जाळण्यात आल्या. तेव्हा पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या. गोळीबारही केल्याचे समजते. मात्र यास पोलिसांनी दुजोरा दिला नाही. रात्री उशिरा पोलिसांनी दंगलसदृश्य परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र तणावपूर्ण परिस्थिती कायम होती.

सहायक पोलीस आयुक्तांसह दहा पोलीस जखमी...

दोन गटाने केलेल्या दगडफेकीत सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर, क्रांती चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक श्रीपाद परोपकारी यांच्यासह दहा पोलीस जखमी झाले असल्याचे समजते. यातील कोळेकर आणि परोपकारी यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर इतर पोलिसांना घाटीत दाखल केले.

पोलिसांच्या तीन गाड्या जाळल्या...

या दंगलीमध्ये पोलिसांच्या तीन गाड्या जाळण्यात आल्या आहेत. तर इतर गाड्यावर तुफान दगडफेक करण्यात आली. परिसरात असलेल्या इतरही गाड्यांची तोडफोड, जाळपोळ केली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें