बाभळेश्वर च्या पाटात निमगावच्या तरुणाचा पाण्यात बुडुन मृत्यु .
शिर्डी(प्रतिनीधी)-निमगाव वाडी हुन शनि शिंगणापुर च्या दिशेने निघालेल्या अक्षय धनराज तुवर (वय-18) रा.निमगाव वाडी (ता.राहाता) जि.अ.नगर याची नगर मनमाड महामार्गालगत असेलेल्या बाभळेश्वर जवळील पाटात बुडुन मृत्यु झाला.काल (दि.20)रोजी दुपारी साडेतीन च्या सुमारास ही घटना घडली.आज सकाळी साडे आठच्या सुमारास त्याचा मृतदेह मिळुन आला. काल दुपारी मित्रांसोबत शनि शिंगनापुरला अक्षय निघाला होता.अक्षय मित्रांसोबत पाण्यात उतरला असता त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला.निमगाव वाडी येथे सामाजिक कार्यकर्ते आणि मित्रांना सदर घटनेची माहिती मिळताच त्याच्या मृतदेहाचा शोध घेण्यात आला.आज सकाळी अक्षयचा मृतदेह मिळुन आला. या घटनेची पोलिसांनी सखोल चौकशी करुन तपास करावा अशी मागणी अक्षयचे वडील धनराज तुवर यांनी केली आहे. याबाबत लोणी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें