भाजपाला सत्ता स्थापनेचं आमंत्रण, उद्या येडियुरप्पांचा शपथविधी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 16 मई 2018

भाजपाला सत्ता स्थापनेचं आमंत्रण, उद्या येडियुरप्पांचा शपथविधी.

भाजपाला सत्ता स्थापनेचं आमंत्रण, उद्या येडियुरप्पांचा शपथविधी.

कर्नाटकमध्ये सत्ता संघर्ष सुरू असताना राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपाला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं आहे. उद्या भाजपाचे बी.एस. येडियुरप्पा यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. बंगळुरू मधल्या स्टेडियममध्ये हा जंगी सोहळा होणार आहे. या निर्णयामुळे काँग्रेसनं संताप व्यक्त केला असून राजभवनावर निदर्शनं करण्याचा इशारा देण्यात आलाय. तसंच या निर्णया विरोधात न्यायालयात जाण्याची तयारीही काँग्रेसनं केलीये. दरम्यान, सर्व आमदार काँग्रेस सोबत असून कुमारस्वामींवर कुणीही नाराज नसल्याचा दावा ज्येष्ठ काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी केलाआहे. तर भाजपच्या आमदारांची बैठक आज संपन्न झाली. त्यात येडीयुरप्पांची विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली.
त्यानंतर येडीयुरप्पा पुन्हा एकदा सत्तास्थापनेचा दावा सादर करण्यासाठी राज्यपालांना भेटीला गेले. येडियुरप्पांनी राज्यपालांची भेट घेतल्यावर सकारत्मक निर्णय होईल असा विश्वास व्यक्त केलाकाँग्रेसचे सर्व आमदार अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत, घोडेबाजार टाळण्यासाठी काँग्रेसने सावधगिरी पाळल्याचं सांगण्यात येत आहे. सर्व आमदारांची रिसॉर्टवर रवानगी करण्यात आली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें