कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं निधन. पहाटे साडे चार वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 31 मई 2018

कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं निधन. पहाटे साडे चार वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं निधन.

पहाटे साडे चार वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


दि.३१/०५/२०१८  प्रतिनिधी.इमरान खान.
मुंबई: कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं के. जे. सोमय्या रुग्णालयात निधन झालं. पहाटे 4 वाजून 35 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमय्या यांना कालच सोमय्या रुग्णालयात अॅडमिट करण्यात आलं होतं. रात्री त्यांची प्रकृती ठिक होती. पण पहाटे चारच्या सुमारास त्यांना हृदय विकाराचा झटका आला. त्यावेळी डॉक्टरही सोबत होते. पण हृदयविकाराचा झटका तीव्र असल्यानं त्यांची प्राणज्योत मालवली. थोड्याच वेळात त्यांचं पार्थिव खामगाव येथे अंतिम संस्कारासाठी नेण्यात येणार आहे. नऊ वाजता मुख्यमंत्री सोमय्या रुग्णालयात फुंडकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतील.

राज्यात काँग्रेसचं वर्चस्व असताना भाजपा वाढवण्याचं काम फुंडकर यांनी केलं. फुंडकर यांच्या निधनानं राज्यात भाजपा रुजवणारा नेता हरपल्याची भावना व्यक्त होतेय. कृषीमंत्री म्हणून फुंडकर यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतले. प्रसारमाध्यमांपासून दूर राहून काम  करणारा नेता, अशी त्यांची ओळख होती. शहरी पक्ष अशी ओळख असलेल्या भाजपाला ग्रामीण भागापर्यंत नेण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. कार्यकर्त्यांमध्ये भाऊसाहेब नावानं ओळखले जाणाऱ्या फुंडकर यांनी विधानसभा आणि विधानपरिषद अशा दोन्ही सभागृहांमध्ये काम केलंय. याशिवाय ते भाजपाचे प्रदेशाध्यक्षदेखील राहिले आहेत.

पांडुरंग फुंडकर यांच्या अकाली निधनानं भाजपासह सर्वांनाच धक्का बसला आहे. फुंडकर आजारी नव्हते. मात्र अचानक हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांची प्राणज्योत मालवली. राज्यात भाजपा वाढवण्यासाठी फुंडकर यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यासह मोठे प्रयत्न केले. ग्रामीण आणि शेती प्रश्नाची जाण असणारा नेता, अशी फुंडकर यांची ओळख होती. फुंडकर बुलडाण्यातील खामगाव विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें