काँग्रेसचे जी. परमेश्वर यांची कर्नाटकच्या उपमुख्यमंत्रिपदी निवड. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 22 मई 2018

काँग्रेसचे जी. परमेश्वर यांची कर्नाटकच्या उपमुख्यमंत्रिपदी निवड.

काँग्रेसचे जी. परमेश्वर यांची कर्नाटकच्या उपमुख्यमंत्रिपदी निवड.

कर्नाटक मध्ये काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर यांच्यात सुरू असलेल्या सत्तास्थापने बाबतच्या वाटाघाटी संपुष्टात आल्या असून, कर्नाटकच्या उपमुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसचेदलित नेते जी. परमेश्वर यांचे नाव उपमुख्यमंत्रिपदासाठी निश्चित करण्यात आले आहे. ही माहिती कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री आणि जनता दल सेक्युलरचे नेते एच.डी कुमारस्वामी यांनी दिली. कर्नाटक मध्ये काँग्रेसने  जनता दल सेक्युलरचे नेते एच.डी. कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा दिला आहे. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या वाटाघाटीनुसार  जी. परमेश्वर यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच काँग्रेसचे नेते के.आर. रमेश यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें