सावळीविहीर खुर्द येथे आजी व नातवाचा पाण्यात बुडुन मृत्यु. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 16 मई 2018

सावळीविहीर खुर्द येथे आजी व नातवाचा पाण्यात बुडुन मृत्यु.

सावळीविहीर खुर्द येथे आजी व नातवाचा पाण्यात बुडुन मृत्यु.

राज दुनबळे.
प्रतिनिधी.शिर्डी.
शिर्डी :-राहाता तालुक्यातील सावळीविहीर खुर्द येथे पाण्यात बुडुन झालेल्या दुर्देवी घटनेत आजीसह नातवाचा मृत्यु झाला.यात आठ वर्षाच्या मुलीची तब्बेत चिंताजनक असल्याचे समजते.या झेल्या घटनेत लिलाबाई आण्णासाहेब आहिरे(वय-46), सुमित अनिल बागुल (वय-15)रा.अंगणगाव रोड,येवला यांचा मुत्यु झाला तर अनुष्का अरुण शिंगाडे (वय-8)रा.ब्राम्हणगाव,ता.कोपरगाव ही मुलीगी गंभीर आहे.ही मुलीची मुले उन्हाळ्याच्या सुटीसाठी आली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की,आजी लिलाबाई आहिरे ह्या धुणे धूत असताना ही दोनही मुले आजी जवळ होती.यावेळी जवळ असलेल्या पाण्यात सुमीत आंघोळीसाठी गेला.आंघोळ करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला त्याची बहीण अनुष्का हीने आरडा ओरड करून त्याला वाचवण्यासाठी तिनही पाण्यात प्रवेश केला मात्र आपली दोन्ही नातवंडे पाण्यात बुडत आहे हे लक्षात घेताच आजी लिलाबाई आहिरे यांनी कुठलाही विचार न करता पाण्यात उडी घेतली.मात्र खाणीत खोलवर पाणी होते.जवळपास कोणी नसल्याने या घटनेत लिलाबाई आण्णासाहेब आहिरे व नातू सुमित अनिल बागुल यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.आरडा ओरड व काहीतरी अनुचित प्रकार घडला आहे हे लक्षात येताच जवळच असलेल्या काही तरुणांनी पुढाकार घेऊन पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.व त्यांना साईबाबा संस्थानच्या सुपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.मात्र उपचार सुरू असताना आजी आणि नातवाचा मृत्यू झाला तर आठ वर्षाची मुलगी अनुष्का हिच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक आहे.घटनेची खबर साईबाबा हॉस्पिटल ने शिर्डी पोलिसांना दिली.पोलिसांनी अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर 46/2018  भा.द.वी.174 प्रमाणे गुन्हा दाखल केला.घटनेचे गांभीर्य लक्षात घेताच पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे,पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन खाणीची पाहणी केली.ह्या दुर्दैवी घटनेमुळे सावळीविहिर पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे..

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें