खर्या विकासासाठी कार्यसंस्कृती जोपासाः प्रा.किसन चोपडे.
21 वर्षांनंतर श्री शिवाजी महाविद्यालयात भेटले मित्र-मैत्रिणी.
वि.प्रतिनिधी.समशेर खान.
परभणी : बदलत्या काळाबरोबर चालताना खर्या विकासासाठी कार्यसंस्कृती जोपासा, असे प्रतिपादन श्री शिवाजी महाविद्यालयाचे माजी राज्यशास्त्र विभाग प्रमुख तथा उपप्राचार्य किसन चोपडे यांनी व्यक्त केले.
दि.20 रोजी महाविद्यालयात आयोजित 1996 च्या बॅचच्या माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव हे होते. तर मंचावर उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशेट्टी,प्रा.यशवंत घारे,प्रा.पी.एन.डाके,प्रा.सावित्री हरदास-चिताडे,प्रा.आर.टी.देशमुख,प्रा.पी.एन.मोरे,प्रा.रविशंकर झिंगरे,प्रा.रोहिदास नितोंडे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना उपप्राचार्य चोपडे म्हणाले की, हा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा केवळ स्नेह जोपासणारा नाही तर महाविद्यालय आणि गुरुजनांप्रतिचा कृतज्ञता व्यक्त करणारा सोहळा आहे.सोशल मिडियाचा सकारात्मक वापर करून आपले सामाजिक उत्तरदायित्व योग्य रितीने पार पाडतानाच जबाबदार नागरिकांच्या कर्तव्याची जाणीव सतत मनात प्रज्वलीत राहू द्या ही भावनाही त्यांनी व्यक्त केली.
महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये तब्बल एकवीस वर्षांनंतर पंचावन्न मित्र-मैत्रिणी एकत्रित आले होते. सर्वांच्या चेहर्यावरून भेटीचा आनंद ओसंडून वाहत होता. प्रत्येकाच्या मनःपटलावरून जुन्या दिवसांच्या अविस्मरणीय आठवणी चित्रफितीसारख्या क्षणात सरकून गेल्याची भावना स्पष्ट दिसत होती. सर्व माजी विद्यार्थ्यांनी आठवण म्हणून महाविद्यालयाच्या प्रांगणात लावण्यासाठी रोपे दिली. याप्रसंगी प्रा.चिताडे, प्रा.घारे, प्रा.डाके, प्रा.नितोंडे यांची समोयोचित भाषणे झाली. माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन त्यांच्यापैकीच गरजू व्यक्ती किंवा त्याच्या पाल्याला शिक्षणासाठी मदत करणे, होतकरू विद्यार्थ्यांना दत्तक घेणे असे सामाजिक उपक्रम राबवावेत, असे सुचविले.
जया तुरूकमाने,सुदाम चव्हाण,रंजना भालेराव या माजी विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव म्हणाले की, माजी विद्यार्थी हे महाविद्यालयाची संपत्ती असून सामाजिक, शैक्षणिक उपक्रमासाठी त्यांनी एकत्र यावे. महाविद्यालय नेहमीसाठी सर्व विद्यार्थ्यां सोबत आहे. प्रास्ताविक गोपाळ नगरसाळे यांनी केले. तर सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सुरेश हिवाळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विलास जैन, वागेश पोपडे, बाळासाहेब काळे,हिरालाल देवतवाल,प्रा.रामप्रसाद देशमुख, सुनील डाके,अण्णासाहेब सोनवणे,अनिल मोरे, अरूण झांबरे, दिपाली काळे, विद्या मालेवार, विद्या गायकवाड यांनी परिश्रम घेतले.
फोटो ओळी...
1. परभणी येथे श्री शिवाजी महाविद्यालयात आयोजित 1996 च्या बॅचच्या माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यात 21 वर्षानंतर एकत्र आलेले मित्र-मैत्रिणी. याप्रसंगी प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशेट्टी, प्रा.यशवंत घारे,प्रा.पी.एन.डाके,प्रा.सावित्री हरदास-चिताडे,प्रा.आर.टी.देशमुख,प्रा.पी.एन.मोरे,प्रा.रविशंकर झिंगरे,प्रा.रोहिदास नितोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें