पवित्र रमजान फक्त खाण्यासाठी, पोटासाठी जगायचं नसतं, तर जगण्यासाठी खायचंअसतं, हे शिकवणारा रमजान सकाळी सव्वा चार ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत म्हणजे जवळपास चौदा तास पेक्षा हि जास्त मे महिन्याच्या उन्हात तहान - भूक सहन करत आयुष्याशी झुंज देण्याचं प्रशिक्षण देणारा, आत्महत्येचा मार्ग झुगारायला शिकवणारा रमजान .
अनवर पठान,(संपादक,तेज़्ज़न्युज़ 24)दि.17/05/2018.
गुरुवारपासून भारतात रमजान महिना सुरू झालेला आहे. रोजे (उपवास) पाळणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी यावर्षीचा रमज़ानचा महिना परीक्षा घेणारा ठरणार असून भारतात पहिलाच रोजा 14 तास 40 मिनिटांचा आहे . त्यानंतर ही वेळ वाढतच जाणार आहे. मुख्य म्हणजे एकही रोजा 14 तासांपेक्षा कमी अवधीचा असणार नाही.14 तासांपेक्षा अधिक अवधीचे रोजे असण्याचा योग३४ वर्षांनंतर पुन्हा आला आहे. 1983मध्ये मे मध्ये रमजानचा महिना आला होता आणि तेव्हाही अशाचप्रकारे 14/15 तासांपेक्षा अधिक वेळ रोजे पाळावे लागले होते.रमजानचा पवित्र महिना दरवर्षी 11 दिवस उशिराने येतो. यंदा गुरुवार पासुन रमझान सुरू झालेला असून 15 जून रोजी रमजान समाप्त होणार आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी देशभरात ईदउल फित्र साजरी केली जाणार आहे.दरम्यान, रमजाननिमित्त इफ्तार पार्टीचीही जोरदार तयारी सुरू झाली असून पुढचा महिनाभर ही रेलचेल राहणार आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें