कानडी जनतेचा कौल कुणाच्या बाजुनं? काय सांगतायत महाएक्झिट पोल. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 12 मई 2018

कानडी जनतेचा कौल कुणाच्या बाजुनं? काय सांगतायत महाएक्झिट पोल.

कानडी जनतेचा कौल कुणाच्या बाजुनं? काय सांगतायत महाएक्झिट पोल.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदानाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळालाय.  संध्याकाळी  पाच वाजेपर्यंत ६४ टक्के मतदान पार पडलंय... त्यामुळे सहा वाजेपर्यंत हा आकडा सरासरी सत्तर टक्क्यांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या विधानसभा निवडणुकीतल्या मतदानापेक्षा यंदा जास्त मतदान होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. सकाळपासूनच मतदान केंद्रांबाहेर मतदारांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. जातीय आणि धार्मिक मुद्द्यावरुन ढवळून निघालेल्या कर्नाटकची जनता कुणाला कौर देणार? याचीच आता साऱ्या देशाला उत्सुकता लागलीय. कर्नाटकमध्ये विधानसभेच्या एकूण २२२ जागांसाठी  मतदान होतंय. दरम्यान, मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर अनेक 'महाएक्झिट पोल' जाहीर झालेत... या 'एक्झिट पोल'मध्ये काँग्रेस पुढे असल्याचं दिसून येतंय. काय सांगतायत 'महाएक्झिट पोल'

* टाईम्स नाऊ -

व्हीएमआर काँग्रेस : ९० - १०३, भाजप : ८० - ९३, जेडीएस : ३१ - ३९, इतर : २ - ४

* आज तक

काँग्रेस : १०६ - ११८, भाजप : ७९ - ९२ , जेडीएस : २२ - ३० , इतर : ००


* रिपब्लिक टीव्ही

काँग्रेस : ९५ - ११४ , भाजप : ७३ - ८२, जेडीएस : ३२ - ४३, इतर : २ - ३

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें