अंधेरी स्टेशनजवळील पुलावर महिलेची चाकूने भोसकून हत्या. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 5 अप्रैल 2018

अंधेरी स्टेशनजवळील पुलावर महिलेची चाकूने भोसकून हत्या.

अंधेरी स्टेशनजवळील पुलावर महिलेची चाकूने भोसकून हत्या.

मुंबईतील महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना अंधेरीत घडली. अंधेरी स्टेशन जवळील पुलावर एका महिलेवर चाकू हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले.अंधेरीतील एका बारमध्ये काम करणारी आनाबीबी शेख (२७ वर्ष) ही महिला बुधवारी रात्री उशिरा स्टेशन जवळील पुलावरून जात होती. एस व्ही रोडरवर अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा हा पुल आहे. पुलावरील पायऱ्यांवर तिच्यावर एकाने चाकू हल्ला केला. यात गंभीर जखमी झालेल्या शेखला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तो पर्यंत तिचा मृत्यू झाला होता. डी एन नगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत एका संशयिताला ताब्यात घेतले. या प्रकरणी हल्लेखोराला आणखी एकाने मदत केल्याचे समोर आले आहे. त्याचा देखील शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रेमसंबंधातून ही घटना घडली का, या दिशेने तपास सुरु असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें