आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटूंबाला आर्थिक मदत. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 2 अप्रैल 2018

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटूंबाला आर्थिक मदत.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटूंबाला  आर्थिक मदत.


सेलु जितूंर विधानसभा प्रमुख तथा जि प गट नेते राम पाटील यांचा पुढाकार.



अजमत पठान.
जिंतूर प्रतिनीधी.
जिंतूर  तालुक्यातील नागणगाव येथील शेतकऱ्याने सततची नापिकी व कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 30  मार्च  रोजी घडली होती याची तत्काळ दखल घेत शिवसेनेचे सेलू जिंतूर विधानसभा अध्यक्ष तथा जि प गटनेते राम पाटील यांनी त्या आत्महत्याग्रस्त कुटूंबाचे सांत्वन करून त्यांना रोख 10 हजाराची आर्थिक मदत 2 एप्रिल केली आहे

या बाबत अधिक माहिती तालुक्यातील नागणगाव येथील शेतकरी प्रभाकर केशव चव्हाण  वय - 35 वर्षे   या तरुण   शेतकऱ्याला जेमतेम 8 एकर  जमीन आहे यावर्षी परतीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले होते यातच स्टेट बँक,महाराष्ट्र ग्रामीण व एचडीएफसी बँकेचे कर्ज घेतलेले होते व गेल्या वर्षी बहिणीच्या विवाहा करीत 2 एकर शेती विक्री करूनही कर्ज फेडू शकले नाही  म्हणून संसाराचा गाडा कसा चालवायचा व बँकेचे कर्ज कसे फेडायचे याच विवनचनेत त्यांनी 30 मार्च  रोजी संध्याकाळी 9 वाजता  वाजता आपल्या शेतात  गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपली होती त्यांच्या पश्चात एक मुलगा,एक मुलगी म्हातारे आई वडील  आहे. म्हणून या घटनेची माहिती मिळतात राम पाटील यांनी तत्काळ कुटुंबाचा घरी जाऊन सांत्वन केले व रोख 10 हजार रुपयांची आर्थिक मदत केली  त्यांच्या या सामाजीक बांधिलकीची सर्वत्र चर्चा होत आहे यावेळी त्यांच्या सोबत शिवसेनेचे तालुका प्रमुख भारत पवार, भारत डख,भास्कर चव्हाण माजी सरपंच, विनायक चव्हाण,उत्तमराव चव्हाण, दादाराव चव्हाण,प्रकाश शिंदे उप सरपंच पदाधिकारी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें