मानवत येथील युवक २४ मार्चपासुन बेपत्ता .
मानवत / मुस्तखीम बेलदारदि.४: मानवत येथील युवक म.मुस्तफा गौस मनियार रा.एकतानगर वय २२ वर्ष हा युवक दि.२४ मार्च पासुन राहत्या घरातुन निघुन गेला आहे या प्रकरणी म.फैसल म.गौस मनियार यांच्या फिर्यादिवरुन मानवत पोलीस स्टेशन येथे हरवल्या बाबतची नोद करण्यात आली आहे .पोलीसाकडुन मिळालेल्या माहितीनुसार मानवत येथील राहणार एकतानगर येथील रहिवासी म.मुस्तफा गौस मनियार वय २२ वर्ष धंदा शिक्षण रंग गोरा उंची पाच फुट अंगावर लाल रंगाचा शर्ट काळी जिन्स पँट मध्यम बाधा डाव्या गालावर तीळ बोलीभाषा मराठी व हिंदि ह्या वर्णनचा युवक दि २४ मार्च पासुन राहत्या घरातुन निघुन गेला आहे.बेपत्ता युवकाचे भाऊ म.फैसल म.गौस मनियार यांच्या फिर्यादिवरुन मानवत पोलीस स्टेशन येथे हरवल्या बाबतची तक्रार नोद करण्यात आली असुन अधिक तपास बीटजमादार प्रताप साळवने हे करीत आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें