पवित्र कुरआनवर आधारित स्पर्धा परीक्षेवर बीड राजगल्ली येथील मदरशाचे वर्चस्व. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 4 अप्रैल 2018

पवित्र कुरआनवर आधारित स्पर्धा परीक्षेवर बीड राजगल्ली येथील मदरशाचे वर्चस्व.

पवित्र कुरआनवर आधारित स्पर्धा परीक्षेवर बीड राजगल्ली येथील मदरशाचे वर्चस्व.


बीड (प्रतिनिधी) बीड शहरातील संपुर्ण इस्लामी शिकवण देणारे मदरशांमधील विद्यार्थ्यांसाठी पवित्र कुरआन शरीफ मधील सुरूवातीचे पाच पारे यातील प्रश्न मंजुषाची स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती. यातील सर्व मदरशांमधून बडी राजगल्ली येथील मदरसा हजरत उमर फारुक बडी राज गल्ली या मदरशाने नेत्रदिपक यश संपादन प्रथम, व्दितीय आणि तृतीय क्रमांक पटकावून आपली छाप निर्माण केली.
मदरसा सिकायतुद्दीन यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदरील स्पर्धा 31 मार्च 2018 रोजी मोमीन पुरा येथील मदीना मस्जिद येथे आयोजित केली गेली होती. यामध्ये जवळपास 40 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या सर्वामधुन बडी राजगल्ली येथील मदरशा उमर फारूक मधून मुस्कान शेख  सलीम, व्दितीय मुस्कान शेख शफिक, तृतीय आतेफा शेख कलीम यांनी नेत्रदिपक यश संपादन करत आपल्या मदरशांचे नाव उज्वल केले. या सर्वांना हाफिज जावेद यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षक हाफिज खालेद साहाब आदींनी अभिनंदन केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें