2 लाख लोकांना समाधान शिबीरातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ - नामदार बबनराव लोणीकर .
समशेर खान.सेलू / प्रतिनिधी
परभणी जिल्ह्यातील 13 तालुक्यात गेल्या 3 महिन्यांपासून समाधान शिबीरातून परभणी व जालना जिल्ह्यातील परभणी लोकसभा मतदार संघातील सुमारे 2 लाख लोकांना समाधान शिबीरातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ दिला आहे. या शिबीरांमध्ये जिल्हास्तरावरील 27 विभागांचे अधिकारी, कर्मचारी तालुक्याच्या ठिकाणी एकत्र येऊन लाभ दिला जात आहे. यातून प्रधानमंत्री आवास योजनेची घरे, रमाई आवास योजना, शबरी योजनेतील घरांचे वाटप आणि मंजुरीच्या प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेन्द्र फडणवीस व केंद्रीय मंत्री मा.ना.श्री. नितीनजी गडकरी यांच्या हस्ते होणाऱ्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रम तसेच परभणी येथील समाधान शिबिराच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीचा आढावा घेणेयासाठी सेलू येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत बोलत होत्ते
समाधान शिबीर उपक्रमात सेलू तालुक्यात आतापर्यंत रहिवासी प्रमाणपत्र-718,उत्पन्न प्रमाणपत्र-1440,जात प्रमाणपत्र-2680,नॉन क्रिमीलेअर प्रमापत्र-432,वय, अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र-369,फेरफार नोंदी-922,पांदण रस्ते खुले करणे-6,मतदान ओळखपत्र -1942,भोगवटदार वर्ग २ चे वर्ग १ मध्ये रुंपातर करणे-5,इंदिरा गांधी राष्ट्रीय वृदधापकाळ योजना-47,संजय गांधी निराधार अनुदान योजना-184,श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजना-354,अपंग, विधवा व इतर योजना-32,राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय योजना-25,उज्वला गॅस योजना-305,अंत्योदय योजना कार्ड वाटप-44,शिधा पत्रिका वाटपः नवीन, दुयम शिधा पत्रिका, नांव कमी करणे नाव समाविष्ट करणे-1045,डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना (कृषी) :- मागासावर्गीयांसाठी सिंचन विहीर, वीज कनेक्शन, मोटार पम्प व तुषार यासाठी ३ लक्ष ५५ हजार अनुदान -13,पंतप्रधान आवास योजना – १ लक्ष ५० हजार-67,बचत गटांना अर्थसहाय- 15000/-प्रति बचतगट-122,स्वच्छ भारत मिशनः १२०००/- प्रती शौचालय-779,शेळी गटाचे वाटप करणे, संकरीत गाई / म्हशींचे वाटप -5,चष्मे, व्हिलचेअर व काठी वाटप करणे- 83,समाज कल्याण विभागः मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण फी परीक्षा फी प्रदाने-175,सर्व शिक्षा अभियानः समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत दिव्यांग मुलांसांठीच्या विविध योजना-39,शिक्षण विभाग (माध्यमिक) :- राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा,राष्ट्रिय प्रोत्साहन भत्ता-2,सौभाग्य योजनाः- गरिबांना ५० रुपयात वीज कनेक्शन -50,सोलार पंप वाटपः- 3,दिनदयाळ योजना (वैयक्तीक जोडणी)-90,ठिंबक सिंचन – 673,हरितगृह/शेडनेट मंजुरी –2,शीतगृह पुर्वसंमती पत्र-1,कृषि यांत्रिकीकरण अंतर्गत – ट्रॅक्टर-30,कृषि यांत्रिकीकरण अंतर्गत औजारे साठी ५०% अनुदान-142,मागेल त्याला शेततळे (वैयक्तिक व सामूहिक)-91,जमीन सुपिकता निर्देशांत प्रमाणपत्र (साइ्रल हेल्थ कार्ड वाटप करणे) वर्षाला एक तालुका -२० गावे निवड, १० हेक्टर करिता एक नमुना घेऊन तो तपासायचा-3336,बॅंकः मुद्रा योजना कर्ज162,मालमत्ता पत्रक (प्रॉपर्टी कार्ड) वाटप करणे-204,शेतजमीन मोजणी व प्रतीचे वाटप करणे-92,अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत पास-788,विहीर-३ लक्ष अनुदान-7,आरोग्य तपासणी-2468,पशु आरोग्य तपासणी-1880,आधार नोंदणी संख्या-1050,वरील योजना शिवाय इतर 1832 अशा एकूण 24736 लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ देण्यात आला आहे समाधान शिबीरे व अन्य माध्यमातून लाभ दिलेल्या लाभार्थ्यांना 19 एप्रिल रोजीच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे यासाठी काना कोपऱ्यातून लोक कार्यक्रमला येणार आहेत अशीही माहिती नामदार लोणीकर यांनी दिली
या आढावा बैठिकरीता मा. विभागीय आयुक्त औरंगाबाद यांनी विजयकुमार फड उपायुक्त (महसूल ), अण्णासाहेब शिंदे अति. जिल्हाधिकारी, श्री सवडे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी जि .प. परभणी कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि .प. परभणी तसेच संबंधित तालुक्याचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषिअधिकरी यांचेसह विविध शासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते
राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गासह सुमारे आठशे कोटी रुपयांचे रस्ते, वीज उपकेंद्रे, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, अमृत पाणीपुरवठा योजना, प्रधान मंत्री आवास योजनेतील घरे अशा सुमारे 1 हजार 70 कोटी रुपयांच्या कामांचे ई-भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते परभणी येथे दिनांक 19 एप्रिल 2018 रोजी केले जाणार आहे, अशी माहिती पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी यावेळी दिली.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें