उन्नाव, कठुआ व सूरतनंतर आता रोहतक मध्ये एका चिमुरडीचा मृतदेह सापडला आहे.हे प्रकार कधि थांबनार. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 16 अप्रैल 2018

उन्नाव, कठुआ व सूरतनंतर आता रोहतक मध्ये एका चिमुरडीचा मृतदेह सापडला आहे.हे प्रकार कधि थांबनार.

उन्नाव, कठुआ व सूरतनंतर आता रोहतक मध्ये एका चिमुरडीचा मृतदेह सापडला आहे.हे प्रकार कधि थांबनार.
URL

उन्नाव, कठुआ व सूरतनंतर आता रोहतक मध्ये एका चिमुरडीचा मृतदेह सापडला आहे. मुलीचा मृतदेह बॅगेत सापडला असून मृतदेह असलेली बॅग एका नाल्यात सापडली. रोहतक मधील टिटोली गावात शेतातील नाल्यात 8 ते 10 दरम्यान वय असलेल्या मुलीचा मृतदेह सापडला. नाल्यात पाणी कमी असल्याने तो मृतदेह असलेली बॅग वाहून न जातातिथेच अडकून पडली.  या प्रकरणात मुलीवर अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, मुलीचे खासगी भाग बाहेर निघाले आहेत तसंच तिच्या हाताचा पंजाही गायब आहे. 4-5 दिवस आधी ही घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. दरम्यान, पोलिसांनी अज्ञाता विरोधात तक्रार दाखल केली आहे.
टिटोली गावात शेतात काम करणाऱ्या लोकांना तेथे एक बॅग सापडली. त्या बॅगेच्या बाहेर हात लोकांना दिसले. त्यांनी लगेचच पोलिसांना याबद्दलची माहिती दिली. पोलिसांनी बॅग बाहेर काढून उघडल्यावर त्यामध्ये मुलीचा मृतदेह दिसला. मुलीचा मृतदेह अतिशय वाईट परिस्थितीमध्ये असून चार ते पाच आठवड्यांपासून हा मृतदेह असावा, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. 'घटनेची माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी पोहचलो. तपास सुरू केला असून हत्येचं कारण अजूनही समजलं नाही. मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठविण्यात आला आहे. पोस्टमार्टेम नंतर घटनेता खुलासा होईल, अशी माहिती पोलीस तपास अधिकारी देवी सिंह यांनी दिली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें