पिंपळदरी येथील गायरान जमीनीवर अतिक्रमण ; सराटी येथील पोलिस पाटील यांच्या विरोधात उपविभागीय अधिका-यांकडे तक्रार दाखल; - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 17 अप्रैल 2018

पिंपळदरी येथील गायरान जमीनीवर अतिक्रमण ; सराटी येथील पोलिस पाटील यांच्या विरोधात उपविभागीय अधिका-यांकडे तक्रार दाखल;

पिंपळदरी येथील गायरान जमीनीवर अतिक्रमण ;  सराटी येथील पोलिस पाटील यांच्या विरोधात उपविभागीय अधिका-यांकडे तक्रार दाखल;


शेख कलीम
सिल्लोड (प्रतिनिधी)दि 17
सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी येथील गायरान जमीनीवर सराटी येथील पोलिस पाटील सुंदर गंजीधर गुळवे यांनी दोन वर्षांपासून अतिक्रमण केले असुन शेतालगतच्या शेतक-यांनी अनेकदा समज देऊनही सदरील गायरान जमीनीवरील अतिक्रमण काढण्यात दिरंगाई केल्या जात असल्याने पिंपळदरी येथील
शेतक-यांनी उपविभागीय अधिकारी सिल्लोड यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली असुन तात्काळ चौकशी करण्यात यावी असी मागणी करण्यात आली आहे.
सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी परिसरातील गायरान गट.क्र.181 मध्ये दोन वर्षांपासून सराटी येथील पोलिस पाटील सुंदर गंजीधर गुळवे यांनी शेतालगतच्या या गायरान जमीनीवर अतिक्रमण केले आहे. अंदाजे आठ - दहा एकर क्षेत्रावर अतिक्रमण करण्यात आले आहे. सदरील अतिक्रमण काढण्यात यावे याबाबत शेजारच्या शेतक-यांनी समजही दिली होती पण संबंधित पोलिस पाटील सुंदर गंजीधर गुळवे हे जुमानाला तयार नाहीत. ते राशन दुकानाच्या माध्यमातूनही अनेकांवर अन्यायच करीत आहेत. गोरगरिबांवर एकप्रकारे अन्यायच करीत आहे. सदरील व्यक्तीची गावात व इतर ठिकाणीही एकप्रकारे दहशतच आहे. जमीनीची मोजणी करावी व अतिक्रमण केलेली गायरान जमीन ताब्यातून काढून घ्यावी तसेच पोलिस पाटील पदावरून निलंबित करावे तसेच सविस्तर चौकशी करुन गोरगरिबांवर होणारा अन्याय दुर करावा असी मागणी उपविभागीय अधिकारी सिल्लोड तसेच तहसिलदारांकडे पिंपळदरी येथील शेख लियाकत तसेच शबनुरवी बाबु तडवी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें