हिरकणी सीबीएसई स्कूलमध्ये पालक मेळावा संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 12 अप्रैल 2018

हिरकणी सीबीएसई स्कूलमध्ये पालक मेळावा संपन्न.

हिरकणी सीबीएसई स्कूलमध्ये पालक मेळावा संपन्न.
url

पालम  ( अनीस खुरेशी ) हिरकणी सीबीएसई इंटरनॅशनल स्कूल चोरवड येथे चालु शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता पालकांना कळावी तसेच विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्यात सुसंवाद निर्माण करण्यासाठी शनिवारी( ता.7 ) रोजी पालक मेळावा संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर.के.कदम होते. तर यावेळी कल्याणराव जाधव,संभाजी रेड्डी ,पत्रकार रमेश महामुने, संजय रायबोले, गोपाळराव देवकते,सोपान निळे, गजानन हंगरगे, महेबूब शेख,प्राचार्य अशोकराव लवटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. सुजित सिंह,प्रा.रंजित सिंग , प्रा.नितेश तांबे, प्रा.अरूण कसबे, राम सोळंके, रहिम शेख, अब्दुल शेख, एन. गांजले, जयश्री लवटे, माऊली लवटे,अल्का कदम , संगीता पवार, वर्षा दुबे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी मॅथ ओलंपियाड परिक्षेत नऊ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक मिळाल्याबद्दल पालकांनी समाधान व्यक्त करून शाळेला ई लर्निग करण्यासाठी नवीन प्रोजेक्टर संच पालकांकडून भेट देण्याचे जाहीर केले.कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने पालक उपस्थित होते

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें