गोरगरीबांचे जीवनमान सुधारण्यासाठी समाधान शिबिराचे आयोजन - नामदार बबनराव लोणीकर .
समाधान शिबिर उपक्रम म्हणजे प्रशासन व जनतेमधील सेतू - नामदार बबनराव लोणीकर .
अज़मत पठान.जिंतूर / प्रतिनिधी
शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकातील नागरिकांना मिळावा तसेच मोलमजुरी करणाऱ्या नागरिकांच्या अडचणी तसेच वैयक्तिक लाभासंदर्भात एकाच ठिकाणी लाभ मिळावा ही समाधान शिबीर आयोजनामागची भूमिका असल्याचे नामदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेन्द्र फडणवीस व केंद्रीय मंत्री मा.ना.श्री. नितीनजी गडकरी यांच्या हस्ते होणाऱ्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रम तसेच परभणी येथील समाधान शिबिराच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीचा आढावा घेणेयासाठी जिंतूर तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत बोलत होत्ते
या आढावा बैठिकरीता मा. विभागीय आयुक्त औरंगाबाद यांनी विजयकुमार फड उपायुक्त (महसूल ), अण्णासाहेब शिंदे अति. जिल्हाधिकारी, श्री सवडे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी जि .प. परभणी कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि .प. परभणी तसेच संबंधित तालुक्याचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषिअधिकरी यांचेसह विविध शासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते
राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गासह सुमारे आठशे कोटी रुपयांचे रस्ते, वीज उपकेंद्रे, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, अमृत पाणीपुरवठा योजना, प्रधान मंत्री आवास योजनेतील घरे अशा सुमारे 1 हजार 70 कोटी रुपयांच्या कामांचे ई-भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते परभणी येथे दिनांक 19 एप्रिल 2018 रोजी केले जाणार आहे, अशी माहिती पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी यावेळी दिली.
समाधान शिबीर उपक्रमात जिंतूर तालुक्यात आतापर्यंत रहिवासी प्रमाणपत्र-809 ,उत्पन्न प्रमाणपत्र-1565,जात प्रमाणपत्र- 815,नॉन क्रिमीलेअर प्रमापत्र-256,वय, अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र-297,फेरफार नोंदी-357,पांदण रस्ते खुले करणे-3,मतदान ओळखपत्र-3389,इंदिरा गांधी राष्ट्रीय वृदधापकाळ योजना -49,संजय गांधी निराधार अनुदान योजना-16,श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजना -30,अपंग, विधवा व इतर योजना-21,राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय योजना-7,उज्वला गॅस योजना-2118,अंत्योदय योजना कार्ड वाटप-34,शिधा पत्रिका वाटपः नवीन, दुयम शिधा पत्रिका, नांव कमी करणे नाव समाविष्ट करणे-327,डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना (कृषी) :- मागासावर्गीयांसाठी सिंचन विहीर, वीज कनेक्शन, मोटार पम्प व तुषार यासाठी ३ लक्ष ५५ हजार अनुदान-96,पंतप्रधान आवास योजना – १ लक्ष ५० हजारः - 5,-बचत गटांना अर्थसहाय- 15000/-प्रति बचतगट - 8,स्वच्छ भारत मिशनः १२०००/- प्रती शौचालय-580,रमाई घरकुल योजना १ लक्ष ५० हजार- 5,शेळी गटाचे वाटप करणे, संकरीत गाई / म्हशींचे वाटप -13,अंध, अंपग, मुकबधिर यांची वैद्यकिय तपासणी करुन त्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करणे- 510,सर्व शिक्षा अभियानः समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत दिव्यांग मुलांसांठीच्या विविध योजना-16,बेटी बचाओ बेटी पढाओ, माझी कन्या भाग्यश्री, पोषण चळवळ-23,सौभाग्य योजनाः- गरिबांना ५० रुपयात वीज कनेक्शन-600,सोलार पंप वाटपः- 2,ठिंबक सिंचन -1411,तुषार सिंचन -365,हरितगृह/शेडनेट मंजुरी -3,कृषि यांत्रिकीकरण अंतर्गत ट्रॅक्टर - 2,कृषि यांत्रिकीकरण अंतर्गत औजारे साठी ५०% अनुदान-23,मागेल त्याला शेततळे (वैयक्तिक व सामूहिक)- 85,जमीन सुपिकता निर्देशांत प्रमाणपत्र (साइ्रल हेल्थ कार्ड वाटप करणे) वर्षाला एक तालुका -२० गावे निवड, १० हेक्टर करिता एक नमुना घेऊन तो तपासायचा -95,बॅंकः मुद्रा योजना कर्ज -9,मालमत्ता पत्रक (प्रॉपर्टी कार्ड) वाटप करणे-15,शेतजमीन मोजणी व प्रतीचे वाटप करणे-17,अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत पास-1711,आरोग्य तपासणी- 2865,पशु आरोग्य तपासणी-866,आधार नोंदणी संख्या-750,वरील योजना शिवाय इतर -1680 अशा एकुण 21938 लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ देण्यात आला आहे समाधान शिबीरे व अन्य माध्यमातून लाभ दिलेल्या लाभार्थ्यांना 19 एप्रिल रोजीच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें