शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांची बदली,सलमानचा तुरुंगातील मुक्काम वाढण्याची चिन्हं. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 7 अप्रैल 2018

शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांची बदली,सलमानचा तुरुंगातील मुक्काम वाढण्याची चिन्हं.

शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांची बदली,सलमानचा तुरुंगातील मुक्काम वाढण्याची चिन्हं.
url

1998 सालच्या काळवीट शिकार प्रकरणीदोषी ठरलेल्या अभिनेता सलमान खानचा तुरुंगातील मुक्काम वाढण्याची शक्यता आहे. सलमानच्या जामिनावर सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांच्या रातोरात बदली झाली आहे. राजस्थानच्या न्यायिक यंत्रणेत मोठे बदल करण्यात आलेअसून याअंतर्गत राजस्थान उच्च न्यायालयाने राज्यातील ८७ न्यायाधीशांची बदली केली आहे. यामध्ये सलमान खानच्या जामिनावर सुनावणी करणारे आणि शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांचाही समावेश आहे. एकाच वेळी 87 न्यायाधीशांची बदली झाल्याने सलमानच्या जामीन अर्जावरील सुनावणी रखण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. काळवीटाची शिकार केल्या प्रकरणी दोषी ठरविलेल्या सलमान खानला कोर्टाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. शिक्षा सुनावल्यानंतर शुक्रवारी सलमानच्या जामिनावर सुनावणी होणार होती पण कोर्टाने सुनावणी न करता निर्णय राखून ठेवला. त्यामुळे सलमानला शुक्रवारची रात्रही तुरुंगात काढावी लागली. आता न्यायाधीशांची बदली झाल्याने सलमान समोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. बिष्णोई समाजाच्या वकिलांच्या मते, राजस्थान मधील न्यायाधीशांची बदली होणं ही नियमित प्रक्रिया आहे. कारण बऱ्याच न्यायाधीशांची बदली ही एप्रिल महिन्यातचहोत असते. सलमानच्या जामीन अर्जावर सुनावणी करणारे जोधपूर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर के जोशी यांचीही बदली करण्यात आली आहे. एप्रिल महिन्यात नेहमी न्यायाधीशांची बदली होते. पण आता एकाचवेळी झालेल्या बदलीमुळे सलमानच्या जामिनावरील सुनावणी लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे शनिवारची रात्रही सलमानला तुरूंगात घालावी लागू शकते. न्यायाधीशांच्या बदलीमुळे सलमानच्या पूर्ण प्रकरणावर नव्या न्यायाधीशांसमोर पुन्हा सुनावणी होईल. त्यामुळे सलमानला आणखी काही काळ तुरूंगातच राहावे लागण्याची शक्यता आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें