सेलू येथे स्व. जनुभाऊ रानडे स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन.व्याख्यानमालेचे हे आठवे वर्ष. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 6 अप्रैल 2018

सेलू येथे स्व. जनुभाऊ रानडे स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन.व्याख्यानमालेचे हे आठवे वर्ष.

सेलू येथे स्व. जनुभाऊ रानडे स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन.

@ व्याख्यानमालेचे हे आठवे वर्ष.
url

सेलू / प्रतिनिधी
भा. शि .प्र. संस्था अंबाजोगाई  स्वामी विवेकानंद शैक्षणिक संकुल सेलू आयोजित व देवगिरी नागरी सहकारी बँक म.औरंगाबाद प्रायोजित स्व. जनुभाऊ रानडे स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन दि.१० व ११ एप्रिल रोजी करण्यात आले आहे.
नुतन विद्यालयाच्या रा.ब. गिल्डा सभागृहात सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प दि.१० एप्रिल रोजी  ' नाथांचे भारुड - एक सामाजिक उपक्रम 'या विषयावर संत साहित्याचे अभ्यासक मा.डॉ .श्री . रामचंद्र देखणे (पुणे)गुंफणार आहेत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध उद्योजक तथा देवगिरी नागरी बँकेचे संचालक श्री सुनील रायठठ्ठा राहणार आहेत. दि.११ एप्रिल रोजी ' जीवनयोगी - साने गुरुजी ' या विषयावर दुसरे पुष्प मा.डॉ .श्री.रामचंद्र देखणे (पुणे)गुंफणार आहेत .अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष श्री .विनोद बोराडे हे राहणार आहेत.
या व्याख्यानमालेला सेलू शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन स्व.जनुभाऊ रानडे व्याख्यानमालेच्या संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें