अभिनेता सलमान खानला काळवीट प्रकरणी शिक्षा झाल्याने कॉन्स्टेबल रवींद्र पाटील यांचे हे पत्र होतंय वायरल. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 6 अप्रैल 2018

अभिनेता सलमान खानला काळवीट प्रकरणी शिक्षा झाल्याने कॉन्स्टेबल रवींद्र पाटील यांचे हे पत्र होतंय वायरल.

अभिनेता सलमान खानला काळवीट प्रकरणी शिक्षा झाल्याने कॉन्स्टेबल रवींद्र पाटील यांचे हे पत्र होतंय वायरल.



अरे ओळखलेत का मला ?
नाही ना ?
अहो मी आहे मुंबई पोलीस रवींद्र पाटील. पाटलाचे पोर.शिवछत्रपती
शिवरायांचे रक्त अंगात असलेला मी होतो एक कर्तव्यदक्ष मुंबई पोलीस. !!प्राण जाय पर वचन न जाय !! हा माझा असली बाणा मरेस्तोवर जपला मी.
लाखो, करोडो रुपयांचे आमिष झुगारून मी ठाम राहिलो अखेरपर्यंत.सलमान खानच्या लँड क्रूझरने २८ सप्टेंबर २००२ या दिवशी पाच जणांना चिरडले तेव्हा या घटनेची तक्रार नोंदवली होती .सलमानचा अंगरक्षक असलेल्या मीच तो पोलिस कॉन्स्टेबल रवींद्र पाटील…हो तोच तो मी रवींद्र ! एक पोलिस आणि नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडलेल्या माझ्यावर मात्र साक्ष फिरवण्यासाठी कमालीचा दबाव आला, नोकरीही गमवावी लागली. बेरोजगार झाल्यानंतर घरातून बाहेर पडावे लागले. मी माझा आयुष्यातील अखेरचा काळ रस्त्यावर अक्षरशः भीक मागून काढला आणि टी.बी.ने खंगून मी आपला जीव सोडला …
     १९९८च्या सुमारास अंडरवर्ल्डकडून धमकी आल्याने अभिनेता सलमान खान याला मुंबई पोलिसांकडून संरक्षण पुरविण्यात आले. पोलीस कॉन्स्टेबल म्हणून मला सलमानच्या संरक्षणासाठी तैनात करण्यात आले. २८ सप्टेंबरच्या रात्री मी सलमानसोबत होतो . सलमान मद्यधुंद अवस्थेत असताना मी त्याला गाडी न चालवण्याचा सुचना व सल्ला ही दिला. परंतु, सलमानने तो धुडकावून भरधाव वेगात गाडी चालवण्यास सुरुवात केली.अखेर वांद्र्यातील अमेरिकन एक्स्प्रेस बेकरीवर जाऊन सलमानची लँड क्रूझर जोरात दळली. या मोठ्या अपघातात एक ठार आणि चार इसम जखमी झाले. या अपघाताची माहिती मीच वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये दिली. त्यावरूनच एफ.आय.आर.नोंदविण्यात आला. मीच सुनावणी दरम्यान सलमान गाडी चालवत असल्याची साक्ष दिली. त्यानंतर या हाय-प्रोफाईल प्रकरणात साक्ष देण्याचे परिणाम मला भोगावे लागले. २००६ मध्ये मी अचानक मला ‘बेपत्ता’ करण्यात आले. माझे एकाएकी गायब होणे सर्वच पोलीस अधिकार्यांना चक्रावणारे होते. सुनावणीदरम्यान सतत गैरहजर राहिल्याचा ठपका ठेवत मे.कोर्टाने मला अटक करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, क्राइम ब्रँचने मार्च २००६ रोजी मला महाबळेश्वर येथून अटक केले. माझी रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली. मला पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आले. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर माझ्या डोक्यावर छप्परही राहिले नाही. एकेकाळी मुंबई पोलीस कर्तव्यदक्ष म्हणून गौरव झालेला मी पाटील २००७ मध्ये शिवडीतील रस्त्यावर भीक मागताना आढळलो .
     एकेकाळी पिळदार शरीरयष्टी असलेला मी ड्रग रेझिस्टंट टी.बी.ने खंगलो होतो. अखेरच्या दिवसांतही मी माझ्या जवळच्या मित्रांना व माझ्या बॅचच्या पोलीस कर्मचार्यांना आपण साक्षीवर ठाम असल्याचे सांगत होतो. अखेर ३ ऑक्टोबर २००७ रोजी शिवडीच्या टी.बी. हॉस्पिटलमध्ये माझा मृत्यू झाला. सुपरस्टारला गजाआड पाठवण्याइतके महत्त्व असलेल्या साक्षीवर ठाम राहण्याची फार मोठी किंमत मला मोजावी लागली.
माणसांच्या आत एक सैतान दडलेला असतो. हे मी प्रत्यक्ष अनुभवलेले व पाहिले आहे. भावनेपेक्षा कर्तव्य नेहमीच मोठे असते. दुर्दैवाने जिवंत असताना माझ्या लढाईला यश आले नाही. मी मेल्यानंतरही न्याय मिळाला नाही …
असो, पुढचा जन्म मिळाला तर नक्कीच पुन्हा रवींद्र पाटील मुंबई पोलीस होईन आणि पैशाने माजलेल्या अशा  अनेक सलमान खान सारख्याला नक्कीच गजाआड करीन .
चला, विचार करा.
तुमचाच
रविंद्र पाटील (मृत)

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें