मानवत येथे तीन तलाक विधेयकाविरोधात मुस्लिम महिलांचा मुकमोर्चाचे आयोजन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 7 अप्रैल 2018

मानवत येथे तीन तलाक विधेयकाविरोधात मुस्लिम महिलांचा मुकमोर्चाचे आयोजन.

मानवत येथे  तीन तलाक विधेयकाविरोधात मुस्लिम महिलांचा मुकमोर्चाचे आयोजन.

 

हजारोंच्या संख्खेत महिलांना सहभागी होण्याचे आवाहन .
url

मानवत / मुस्तखीम बेलदार                 
दि.०७:  आँल इंडिया मुस्लिम पर्सनल लाँ बोर्डाच्या निर्देशनानुसार तीन तलाक विधेयकास विरोध करण्याकरीता मानवत शहर व तालुक्यातील मुस्लिम महिलांचा मुक मोर्चा  दि.१० एप्रिल सकाळी १० वाजता बेलदार फंगशन हॉल येथुन मंञीगल्ली मार्ग होत मेनरोडावरुन तहसिल कार्यालय मानवत ईथपर्यत धडकणार आहे.नुक्ताच झालेल्या आँल इंडिया मुस्लिम पर्सनल लाँ बोर्डाच्या बैठकीत केद्र सरकारने लोकसभेत पारीत केलेल्या शरियतच्या तीन तलाक  या कायद्याचा विरोधात रोष व्यक्त करण्यासाठि व केंद्र सरकार मुस्लिम शरीयत इस्लामी कायद्यामध्ये ढवङा ढवङ करून समस्त मुस्लिम धर्माच्या नागरिकांच्या भावना  दुखावण्याचा प्रयत्न करित असुन त्याची सुरूवात तीन तलाक पासुन करण्यात आली म्हणुन या तीन तलाकच्या कायद्याचा विरोध देशातील सर्व मुस्लिम महिला हे करित आहेत त्यासाठी प्रत्येक जिल्हा व तालुकास्तरावर मोर्चे काढुन कायद्याचा विरोध करित आहेत या विरोधासाठी मानवत तालुक्यातील महिला एकजुट होऊन १० एप्रिल रोजी तहसिल कार्यालयावर मुकमोर्चा काढुन तीन तलाक बीलचा विरोध करणार आहे यासाठी    मुस्लिम  महिलांनी मोठ्यासंख्येने उपस्थीत राहण्याचे आवाहन मर्कजी कमीटी च्या आयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.

फोटो ओळी - आँल इंडिया मुस्लिम पर्सनल लाँ बोर्डाच्या निर्देशनानुसार तीन तलाक विधेयकास विरोध करण्याकरीता मानवत शहर व तालुक्यातील मुस्लिम महिलांचा मुक मोर्चा  दि.१० एप्रिल रोजी तहसिल कार्यालय मानवत येथे धडकणार असुन या मुक मोर्चा चे निवेदन तहसिलदार आश्विनी जाधव यांना देण्यात आले यावेळी नगरसेवक अकबर अन्सारी ,ॲड.मोसीन मनियार ,ईरफान बागवान,मुस्तखीम बेलदार उपस्थीत होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें