वालुर शिवारातील विहिरीत एकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 30 अप्रैल 2018

वालुर शिवारातील विहिरीत एकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ.

वालुर शिवारातील विहिरीत  एकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ.

समशेर खान.
प्रतिनिधी.सेलु.
एकाचा कामांसाठी असलेल्या विटभट्टीलगतच्या विहिरीत रविवारी (ता.२९) मुतदेह  आढळून आला असुन या घटनेची सेलू पोलिस ठाण्यात आकास्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तालुक्यातील वालुर येथील रहिवासी सुनिल सर्जेराव पांजगे (वय 23 वर्षे) हा मानवत रस्त्यावर असलेल्या ईस्माईल मुल्ला यांचा शेतातील विटभट्टीवर  मजुरी कामांसाठी कुटुंबासह राहत होतो. विटभट्टीलगतच्या विहिरीत रविवारी सकाळी साडे अकरा वाजता विहिरीतील संपूर्ण पाणी ऊपसल्यानंतर मृतदेह सापडला. उत्तरीय तपासणी सेलू ग्रामीण रुग्णालयात करण्यात  आली. वालुर येथे सायंकाळी  अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात पत्नी दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. सुनिल पांजगेच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नसले तरी अशोक काशीनाथ पांजगे यांच्या खबरे वरुन घटनेची पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस निरीक्षक दादाहरी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली वालुर पोलिस  दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक एस.पी.चवरे हे करीत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें