जग सुंदर करण्यासाठी लेखक सत्याच्या बाजूने उभे राहतात---प्रा.राहुल कोसंबी यांचे प्रतिपादन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 11 अप्रैल 2018

जग सुंदर करण्यासाठी लेखक सत्याच्या बाजूने उभे राहतात---प्रा.राहुल कोसंबी यांचे प्रतिपादन.

जग सुंदर करण्यासाठी लेखक सत्याच्या बाजूने उभे राहतात---प्रा.राहुल कोसंबी यांचे प्रतिपादन.


!! लेखकाच्या भेटि शाळेची वारी !! या अभिनव उपक्रमात कविता व लेखन प्रक्रिया याची विद्यार्थ्यनि केला उकल.

आजय बोराडे.
औरंगाबाद / भराडी  बातमिदार लेखक आहे  त्या जगावर समाधानी नसतो.त्याला अधिक सुन्दर ,समृद्ध करण्यासाठी तो वाचन, चिंतन ,मनन करुण लिहित असतो.तो नेहमी सत्याच्या बाजूने उभा राहतो असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक ,लॉ विद्यापीठातील प्रा.राहुल कोसंबी यांनी लेखकाच्या भेटि शाळेची वारी या भराडी ता.सिल्लोड येथील ज्ञानविकास प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या अभिनव उपक्रमात औरंगाबाद येथील व्ही.एन.लॉ कॉलजच्या सभागृहात केले.

लेखक का लिहितात,लेखनाची प्रक्रिया कशी होते, आपण जी पुस्तके वाचतो त्यात लिखाण करणारे लेखक ,कवी असतात तरि कशे,लेखनाचे विविध पदर व प्रकार जानून घेण्यासाठी भराडी ता.सिल्लोड येथील ज्ञानविकास विद्यालयाने वैचारिक लेखन करणारे लेखक प्रा.कोसंबी,डॉ.प्रतिभा अहिरे यांच्याशी विद्यार्थ्यांचा मुक्त संवाद घडवून आणला .यावेळी बोलताना प्रा.कोसंबी म्हणाले की,पाठयपुस्तकातिल लेखक हा देखील मानुसच असतो असे मला फार उशिरा कळले कारन लेखक ,कवी यांच्या भेटिचा योग शालेय जीवनात आला नाहीं व या विद्यालयाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यना या उपक्रमात आणून विचारप्रवन करायला लावले.वैचारिक लेखकास स्वतः होऊन एकट पड़ाव लागत,वैचारिक पातळीवर संघर्ष करावा लागतो व हे करीत असता त्याला वैचारिक शत्रुहि तयार होतात.व ही जोखिम त्याला पत्करावि लागते.लेखक होने हा स्वतःला समृद्ध करणारा प्रवास आहे.आज विविध दूरदर्शन वाहिन्या,मोबाइल,इंटरनेट या माध्यमांच्या दबावाखाली विद्यार्थी आपले अस्तित्व ,व्यक्तिमत्त्व हरउन बसला आहेत,अभिव्यक्तीचे शब्द मरत आहेत.यातून बाहेर पडन्यासाठी पुन्हा आपल्याला वाचनाकडे आणि माणसाकडे जावे लागणार आहेत तरच आपले जगने अर्थपूर्ण होईल.

यावेळी डॉ.अहिरे यांनी 'आई','मी येईन वर्गात तेव्हा ','पंख पसरीन म्हणते 'या कविता सादर केल्या.विद्यार्थिनींच्या प्रश्नाना उत्तर देतांना त्या म्हणाल्या की,जे अखिल मानव जातीचे हित करते ,जे सर्वाना सहित नेते तेच खरे साहित्य असते.भोवतालचे माणसे ,त्यांचे दुःख,शोषण या विषयी सहवेदना व संवेदना असेल तरच कविता व लेखन जिवंत राहते अन्यथा ते लेखन बेगड़ी ,निर्जीव होते.ज्याप्रमाणे भुगर्भातील सुक्षमातील सूक्ष्म हालचाली सेस्मोग्राफ यंत्रावर नोंदविल्या जातात त्याच प्रमाणे खऱ्या लेखकाचे मन ,मेंदू कार्यरत असते.

यावेळी देवानंद पवार यांनी 'मह्या मायच चित्रण ग ' तर राजू चिमनकर यांनी 'शेतकरी 'कविता सादर करुण उपस्थितांना अंतर्मुख केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्तानि असलेले मिलिंद लक्ष्मीकांत पाटिल  आपल्या अध्यक्षीय भाषनात म्हणाले की ,विद्यार्थ्यांचा लेखक -कविशि असा संवाद घडवुन आनल्याने अभ्यासक्रमच्या चौकटिच्या बाहेर विद्यार्थी पडतील व हेच खरे शिक्षण आहे.शिक्षणाला बाजारू स्वरुप आल्याने विद्यार्थी ज्ञानार्थि कम परीक्षार्थी जास्त बनवल्या जात आहेत.याकरिता अश्या प्रकारच्या वेगवेगळ्या वाचन,लेखन कार्यशाळा आयोजित केल्याच पाहिजे.

चर्चासत्रमधे अश्विनी गोंगे,दिव्या थोरात,शिवानी शिंदे,पूजा मनगटे,ऋतुजा राजपूत ,पूजा शिंदे आदि विद्यार्थिनीनि लेखक, कवी यांना प्रश्न विचारुण चर्चा सत्र खऱ्या अर्थाने रंगविले.

प्रास्ताविक मुख्याध्यापक रायभान जाधव यांनी केले, या उपक्रमात विद्यालय,लेखक,विद्यार्थी यांचा समन्वय राजानंद सुरडकर यांनी घड़वुन आणला, उपक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे संदीप साळवे,अनिलकुमार थोरात,अंकुश सोनवणे,योगेश देशमुख,विठ्ठल गव्हाने,सुजीत देशमुख,नरेश बलकार,समाधान सुसर,श्रीमती सुनीता काकडे,निवृत्ति जाधव,प्रकाश निकम आदिनी प्रयत्न केले .तर संचलन भाऊसाहेब झिरपे व आभार निशांत पवार यांनी मानले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें