सेलु येथे प्रत्येक शनिवारी मोफत रुग्ण तपासणी.
◆डाॅ. मेहता यांचा अभिनव उपक्रम.
![]() |
सेलू :- समाजाचे काहीतरी देणे लागते या सामजिक भावनेने प्रेरित होवुन तालुक्यातील रुग्णांना मोफत सेवा पुरविण्याचा मानस येथील त्वचारोग, गुप्तरोग व सौंदर्य शास्र तज्ञ डाॅ. आशिष ओमप्रकाश मेहता यांनी केला आहे.
भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधुन प्रत्येक शनिवारी रुग्णांची मोफत तपासणी करण्यात येणार असून याचा सुभारंभ शनिवारी 14 एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. शहरातील हुतात्मा स्मारक येथे त्वचारोग, गुप्तरोग व सौदर्या संबिधीत रुग्णाची मोफत तपासणी सकाळी 12 ते दुपारी 3 यावेळेत करण्यात येणार आहे. ही सेवा डाॅ. मेहता हे निस्वार्थी भावनेने आयुष्यभर करणार आहेत. ही प्रेरणा त्यांना त्यांच्या कुटुंबीयापासुन मिळाली असून ही प्रेरणा घेवुन रुग्णांची सेवा हा दृष्टीकोन समोर ठेवुन करणार आहेत. सदरील सेवेचा लाभ तालुक्यातील रुग्णांनी घेण्याचे अवाहन डाॅ. आशिष मेहता यांच्या वतीने करण्यात आले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें